किवळे,दि.१९ डिसेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रोजचा प्रभागात फेरफटका मारत असताना प्रभागातील नागरीकांच्या रस्त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या,त्यामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारी नुसार पहाणी केली व प्रभाग क्रमांक १६ मामुडौं, किवळे, विकास नगर, रावेत या प्रभागातील अंतर्गत रस्ते व मुख्य रस्ते यावर खड्डे व रस्ते खालीवर झालेले तसेच आपले मनपा अंतर्गत काम पूर्ण झाल्यानंतर विखुरलेले रस्ते व अर्धवट काम सोडलेले रस्ते यामुळे नागरिकांच्या वाटसुरुच्या ये-जा करण्यात अडचणी निर्माण होत आहे. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी रस्त्याचे दुरुस्तीचे त्वरित कामे पूर्ण करून घ्यावे.असे पञ राष्र्टवादी काॅंग्रेस पार्टी चिंचवड विधान सभेचे उपाध्यक्ष,संकल्प सोशल फाऊंण्डेशन चे संस्थापक अध्यक्ष बापु दिनकर कातळे यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त,अतिरक्त आयुक्त १,२,३ व कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग ब प्रभाग,क्षेञिय अधिकारी ब प्रभाग यांना पञ देऊन कळववे व पञ वजा इशारा दिला आहे.अन्यथा नागरीक रस्त्यावर उतरतील,त्यामुळे आपण विनंती पुर्वक कामे लवकर कारावी.अशी माहिती बापु कातळे यांनी पञकारांना दिली.