पिंपरी,दि.१६ नोव्हेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- आमदार अण्णा बनसोडे यांची प्रजेचा विकास ने घेतली मुलाखत.बोलताना अण्णा बनसोडे यांनी केलेल्या कामाचा उलगडा करत मनोगत व्यक्त केले.काय म्हणतात आमदार अण्णा बनसोडे…
प्रथमता मी सर्व मतदारांचे व नागरीकांचे आभार मानेन कारण मी आमदार त्यांच्या मुळे झालो,व सर्वात जास्त निधी मंजुर करुन आणला.आपला हक्काचा माणूस म्हणून संपूर्ण विश्वास ठेऊन आपण मला सन २०१९ मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून दुसऱ्यांदा निवडून दिले आणि आपली सेवा करण्याची मला संधी दिली. माझ्या आमदारकीच्या आता पर्यंतच्या कार्यकाळात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यामधून आपली सेवा करुन आपण माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
आपल्या मतदार संघात सर्व धर्मातील धार्मिक मंडळे व संस्थांना धार्मिक कार्यासाठी आर्थिक मदत, जेष्ठ नागरिकांना धार्मिक यात्रा, महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत तसेच बचत गटातील महिलांना रोजगाराच्या संधी, संपूर्ण मतदारसंघात आयुष्यमान भारत स्मार्ट कार्ड वाटप, महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत हजारो रुग्णांवर मोफत उपचार, रक्तदान शिबिराचे आयोजन, सिध्दार्थ मोफत विमा योजना, सिध्दार्थ पुस्तकपेढीच्या माध्यमातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप, परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, मतदार संघातील शाळेच्या वर्गखोल्या डिजीटल करणे, पैलवान दत्तक योजनेतंर्गत होतकरु पैलवानांना वैयक्तिक मदत, मतदारसंघात विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन, अण्णा बनसोडे युवा मंचच्या माध्यमातून हजारो टपरी धारक व फेरीवाला यांना स्टॉल वाटप व युवकांना रोजगार व नोकरी महापुरुषांच्या जयंत्या, गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, साजरे करणाऱ्या सुमारे १२०० मंडळांना दरवर्षी आर्थिक सहाय्य, माझी लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, संजय गांधी निराधार योजना, बांधकाम कामगार योजनांतर्गत आर्थिक सहाय्य मिळणेसाठी मदत करण्यात आली, कोरोना काळात हातावर पोट भरणाऱ्या अनेक मजूर कुटुंबांना किराणा, रेशन व इतर आवश्यक साहित्यात वाटप, कोरोना काळात रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांना खाण्याची सोय, तसेच लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार त्यांच्या वारसांना नोकरी मिळवून देण्यात आल्या. कोरोना काळात अशाप्रकारे अनेक विकासकामे तुमच्या साथीने व माझ्या पुढाकाराने पूर्ण केली.
तसेच माझ्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत हरित सेतू विषयक कामे, कासारवाडी येथे कचऱ्यावर पुर्नप्रक्रिया (Recycling) केंद्र, आकुर्डी रेल्वेस्टेशन जवळील जागेत खाद्यपदार्थ केंद्र (Food Court),प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी व पिंपरी येथे 938 सदनिका, दापोडी ते निगडी हायवेलगत पाईप लाईन, दापोडी ते निगडी दरम्यान अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ते विकसीत, बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलाचे लोकार्पण, यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे निवासी डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था व पदव्युत्तर शिक्षणासाठी इमारत, निगडी-रावेत किवळे यांना जोडणारा रेल्वेलाईनवरील पुल बांधकाम, फुगेवाडी येथे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या पहिल्या शाळेची सुरुवात इत्यादी कामे पूर्णत्वास नेली आहे.
विधानमंडळ कामकाज, मंत्रालयीन विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या माध्यमातून या विभागाच्या महत्त्वाच्या व धोरणात्मक निर्णयाकरिता माझा पाठपुरावा सुरु आहे. त्यापैकी शाहूनगर, संभाजीनगर मधील सोसायट्यांना 0.5% FSI मंजूरी व वाढीव बाल्कनीसाठी दंड कमी, मतदार संघात उच्च व लघुदाब भूमीगत वाहिन्या व नवीन रोहीत्रांची उभारणी, आकुर्डी निगडी प्राधिकरण येथे भूमीपुत्रांना 11.5 टक्के परतावा, आन्द्रा आसखेड पाईपलाईन योजना व अमृत योजने अंतर्गत प्राधिकरण निगडी येथे नवीन पाईप लाईन योजना अशा अनेक महत्वाच्या व लोकहिताच्या विषयांस मार्गी लावण्यात मला यश मिळाले आहे.
तसेच संपूर्ण मतदारसंघात मेट्रोचे जाळे उभारुन चाकण, तळवडे व हिंजवडी यांना जोडणारा मेट्रोमार्ग उभारणे, पिंपरी- चिंचवड शहरा मधील वाढती लोकसंख्या विचारात घेवून पुढील २५ वर्षासाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या नियोजनासाठी पवना धरणाची उंची वाढवणे किंवा अन्य पर्याची व्यवस्था करणे. तसेच विधानसभा क्षेत्रातल्या सर्व झोपडपट्ट्यांचे पुनवर्सन करणे, पिपरी चिंचवड शहरातील पोलिस आयुक्तालय, पोलीस स्टेशन व पोलीस कॉलनी अद्ययावत करणे, स्व. बाळासाहेब ठाकरे वल्लभनगर एस.टी. स्टँडचा पुनर्विकास करणे, दुर्गा टेकडी येथे आंतरराष्ट्रीय वेलनेस सेंटर व निसर्गोपचार केंद्र उभारणे, पिंपरी येथे माता रमाई स्मारक, निगडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, पिंपरी गावात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्रावर थीमपार्क उभारणे, मतदार संघात अंडर वॉटर जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारणे, चिंचवड औद्योगिक वसाहतीतील फिनोलकरांचा जागेत आंतरराष्ट्रीय डेटा सेंटरचे काम प्रगती पथावर असून त्यामुळे लाखो युवकांना आयटी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अशा अनेक बाबींचा सतत पाठपुरावा माझ्या मार्फत सुरु आहे,आणि ते मी पुर्णत्वास नेणार
विविध कामांद्वारे आपली सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे.आणि पुढील पाच वर्षे अशीच आपली सेवा करण्यासाठी आपण मला आशीर्वाद द्याल,मतदान करुन पुन्हा आपले प्रेम आपला आशिर्वाद कायम ठेवा अशी अपेक्षा करतो. असे स्पष्ट मत आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.