पिंपरी,दि.१४ नोव्हेंबर २०२४ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-ठिकठिकाणी झालेले स्वागत… माता-भगिनींनी केलेले औक्षण… ज्येष्ठांनी दिलेला आशीर्वाद… महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा विजयाचा विश्वास… अशा उत्स्फूर्त प्रतिसादात पिंपरी मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना मिञपक्षाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांची युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत आकुर्डी परिसरात पदयात्रा पार पडली.आकुर्डीचे ग्रामदैवत खंडोबाचे सहकुटुंब दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर ओव्हाळ यांची पदयात्रा सुरू झाली.
आकुर्डी, गंगानगर,प्राधिकरण या भागातून निघालेल्या पदयात्रेचे नागरिकांनी स्वागत केले. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाळासाहेब ओव्हाळ यांनी युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्या समवेत घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांशी संवाद साधला. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करून त्यांना विजयी भवचा आशीर्वाद दिला. विविध घोषणांच्या जयघोषाने परिसरात चैतन्य पसरले होते. मित्र पक्षातील सर्वच घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. बाळासाहेब ओव्हाळ यांना निवडून आणण्याचा निर्धार येथील मतदार बंधू भगिनींनी केला आहे.आकुर्डी परिसरामध्ये आयोजित केलेल्या पदयात्रेत जागोजागी स्थानिक नागरिकांनी उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ यांना पाठिंबा दिला. आकुर्डी परिसरात बाळासाहेब ओव्हाळ यांच्या प्रचारार्थ निघालेल्या भव्य पदयात्रा रॅलीचा समारोप आकुर्डी प्राधिकरणात करण्यात आला.या पदयात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अनेक नागरिकांनी बाळासाहेब ओव्हाळ यांना घरामध्ये बोलावून त्यांना समस्या सोडवण्याची विनंती केली.
ध्यास ‘सुराज्या’चाच…युवराज शहाजी राजे छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘स्वराज्यकर्ते’ या पैलूबरोबरच आणखी एक रूप अतिशय महत्त्वाचे आहे ते सुराज्यकर्ते म्हणून. शिवाजी महाराजांसारखे लोकोत्तर नेते आपल्या कर्तव्याचा, जबाबदारीचा आणि राज्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचा, घटनेचा किती बारकाईने व सम्यक विचार करतात, त्यांचा दृष्टिकोन नेहमी कार्यक्षम, लोकाभिमुख मुलकी प्रशासनावर होता.या प्रमाणे आम्हाला सुद्धा महाराष्ट्र स्वराज्य पक्षातून नागरिकांना अपेक्षित असणारे लोकाभिमुख असे नेतृत्व द्यायचे आहे त्यामुळे बाळासाहेब ओव्हाळ यांना मतदार निश्चित बहुमताने विजयी करतील असा विश्वास प्रसार माध्यमांशी बोलताना युवराज शहाजी राजे छत्रपती यांनी व्यक्त केला.