मावळ,दि.१४ नोव्हेंबर २०२४( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी ):- आमदार सुनील शेळके पाच वर्षांमध्ये केलेले काम हे जनतेला भावल त्यामुळे जनतेतला नेता मावळाला खुप दिवसांनी मिळाला,त्यामुळे जनसामान्य माणसाच्या मनामनात आमदार सुनिल शेळके राज्य करत आहेत.त्यामुळे शेळके पुन्हा आमदार होणार हे मा.राज्यमंञी संजय भेगडे यांना टोचत होते.त्यामुळे कोण निवडणुक लढणार याकडे त्यांच लक्ष होत.माञ रवि भेगडे की बापु भेगडे कोणाला पकडायच ह्यात त्यांनी वेळ न घालवता बापु भेगडे यांना पाठींबा देत भाजपा चा राजीनामा दिला.आणि सर्व मावळातुन भाजपाचा नाराजीचा सुर बाहेर पडला.आणि भेगडे लाॅबींग तयार झाली. याचा फटका बापू भेगडे यांना बसणारच आहे. माञ ह्याचा फटका संजय भेगडे यांना बसणार याची कल्पना नसावी हाच चर्चेचा विषय बनला आहे.त्यामुळे भेगडे म्हणजे पुन्हा दहशत असे वातावरण मावळच्या मतदारांच्या मनात निर्माण झाले आहे का? त्यामुळे मावळ लोकसभेत कोण बाजी मारणार अशी चर्चा जोरात सुरु आहे.जनतेतुन निर्माण झालेला जनसेवक की बदला घेण्यासाठी व्यक्तीगत कारणासाठी लढणारे,माञ बापु भेगडे यांची नेतृत्वाची चाहुल हि पुर्णत्वास संजय भेगडे नेतील का? अशी चर्चा जोर धरु लागली आहे. येणाऱ्या २३ नोव्हेंबर रोजी काय निकाल येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मात्र मावळचा विकास जिंकेल की मावळची दडपशाही हे पाहण्यासारखे आहे. पॅटर्न कोणता विकासाचा की दडपशाईचा हे मात्र पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मावळ विधानसभेकडे लागलेला आहे.