जिंतुर,दि.०२ नोव्हेंबर २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पत्रकारांनी राजकारणात जाऊ नये, असा काहींचा धोशा असतो. वास्तविक पाहता पत्रकार थेट लोकप्रतिनिधी म्हणून संसद वा विधानसभेत गेल्याच्या अनेक घटना आजपर्यंत झालेल्या आहे. हे चित्र जगभरातही दिसून येते. पत्रकारांनी राजकारणात आपल्या भूमिका मांडत असताना समाजहित आणि देशहितास प्राधान्य देऊनच त्याचा अंगीकार केला पाहिजे हे अपेक्षित आहे.
यासाठी राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारांना रिंगणात उतरवले तर काही अपक्ष व बंडखोर अपक्षांनी देखिल दंड थोपटत निवडणुकीस सामोरे जात आहे,माञ चर्चा पञकार अमोल डंबाळेची जोरात सुरु आहे.कारण पञकार अमोल डंबाळे देखील जिंतूर विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणुक लढवत आहेत. राजकारणामध्ये खरंच बदल हवा आहे,चेहरा नवा आणि काम करणारा हवा आहे. युवा सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकाराची चर्चा जिंतुर तालुका भर सुरू आहे.कारण पञकारीता करत असताना सर्वसामान्यनां न्याय देणे त्यांची कामे अडचणी सोडवणे,माञ कुठेही पब्लिसीटी न करणे,त्यामुळे त्यांचा मागचा जनाधार वाढत आहे.
प्रस्थापित विरुद्ध पत्रकार अशी रंगतदार लढत होणार हे मात्र नक्की.
जिंतूर विधानसभा मतदार संघातून, भाजपच्या अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार बोर्डीकर मेघना व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विजय माणिकराव भांबळे हे अधिकृत उमेदवार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश नागरे हे जिंतूर-सेलू विधानसभेसाठी उमेदवार आहेत.विशेष म्हणजे प्रस्थापितांना टक्कर देण्याचे धाडस या पत्रकाराने केले आहे. बोर्डिकर,भांबळे विरुद्ध डंबाळे अशी तिरंगी लढत पाहयला मिळेल अशी चर्चा सर्व जिल्हात आहे.
पत्रकारिता करत असताना समाजाशी जुळलेली नाळ आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या हक्क प्रश्न आणि त्यांच्या भौतिक गरजा हे लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीला विचारात घेता विधानसभेच्या रिंगणात पत्रकार अमोल डंबाळे यांनी घेतली उडी,
मतांचे कॅल्क्युलेशन केलं असता स्वतःच्या घरचे मित्रमंडळी पाहुणे जवळचे असे मिळून २०००० च्या घरात पॉकेट वोट असणारे अमोल डंबाळे जनतेच्या मनावर करिष्मा करतील का की माघार घेतील पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न सोडविले तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचा काम अमोल डंबाळे यांनी केले आहे.मात्र तोच आवाज विधानसभेपर्यंत पोहोचत नसल्याने थेट विधान भवनातून सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वाढती महागाई,वशेतमालाला हमी भाव,व दंडलशाहीला विरोध करण्यासाठी,दुधाचे भाव,उसाला भाव,कापसाला भाव,सोयाबिन,कडधान्य हे प्रश्न,सरकारी शाळा स्मार्ट करण्यासाठी,उच्चशिक्षणाला विद्यार्थ्यानां जिंतुर विधानसभेत अभ्यासाठी,व बेरोजगारी हटवुन रोजगार मिळवुन देण्यासाठी,आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसवत आहेत,गरजुना मोफत उपचार मिळावे या साठी पञकार अमोल डंबाळे यांना विधान सभेत जायचे आहे.धनदांडगे,व्यवसायिक टेकेदारांचा पोशिंदा म्हणुन नाही तर जनतेचा जनसेवक म्हणुन आमदार व्हायचे आहे.असे पञकार आमोल डंबाळे यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.