पिंपरी,दि.२८ ऑक्टोबर २०२४( प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी विधान सभेवर जास्तीच लक्ष देवुन अनेकांनी आपले पायमुळे रुजवण्यास सुरवात केली माञ महायुती राष्र्टवादी घडयाळ चिन्हाचे अधिकृत उमेदवार आण्णा बनसोडे ठरले तर महाविकास आघाडीचे राष्र्टवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर या ठरल्या.माञ महायुती व महाविकास आघाडी दोन्ही कडे सावळा गोंधळ पहायला मिळाला,माञ या सर्व घडामोडीत तिकीट मिळवण्यासाठी झालेली रस्सीखेच दिसली.आण्णा बनसोडे यांचे पारडे अजुनही जड दिसत आहेत.त्यामुळे त्यांचा पराभव होणे शक्य नाही.कारण त्यांच्या पराभवासाठी महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपुस चालुच आहे.तर दुसर्या बाजुला अपक्षांचे टेन्शन चंद्रकांताताई सोनकांबळे,सीमा सावळे,गौतम चाबुकस्वार,दीपक रोकडे, महाराष्ट्र स्वराज्य पक्षा चे बाळासाहेब ओव्हाळ,वंचितचे मनोज गरबडे असे दिग्गजांनी निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.या मुळे महायुतीचा विजयचा मार्ग सुकर म्हणावा लागेल.त्यात आण्णा पुन्हा विधान सभेत जातील.माञ या सर्व घडामोडीत जनता आपला निर्णय कसा घेतात हे निकलाच्या दिवशी म्हणजे म्हणजेच २३ नोव्हेबंरला दिसेल.त्यामुळे सर्व शहराचे लक्ष पिंपरी विधानसभे कडे लागुन आहे.