Home ताज्या बातम्या पीसीईटी मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सर्वांत मोठा गरबा नाईट आयोजित

पीसीईटी मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सर्वांत मोठा गरबा नाईट आयोजित

0

पिंपरी,दि. १८ ऑक्टोबर २०२४( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- देशातील अग्रमानांकित शैक्षणिक संस्थापैकी एक असणाऱ्या, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट मध्ये ‘ढोल बाजे – दांडिया नाईट’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पीसीईटी आकुर्डी कॅम्पस मधील ४५०० पीसीईटीयन्स या दांडिया नाईट मध्ये सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी – विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी यांनी रास-दांडिया, पारंपरिक गरब्याचा आनंद लुटला. यंदाचे या दांडिया नाईटचे तीसरे वर्ष होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताच्या उद्योग क्षेत्र आपल्या कर्तृत्वाने उजळून टाकणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण स्वर्गीय रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात आली. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे नरेंद्र ज्ञानेश्वर लांडगे यांनी सपत्नीक देवीची आरती करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
ढोल बाजे दांडिया नाईट यशस्वी करण्यासाठी पीसीईटी कॅम्पस डायरेक्टर प्रताप देवकर, पीसीईटीचे डिजिटल मार्केटिंग हेड डॉ. केतन देसले, प्रा. आनंद बिराजदार व झोलोस्कॉलर ची संपूर्ण टीम यांनी परिश्रम घेतले.
या गरबा नाईटच्या यशस्वी आयोजनासाठी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मार्गदर्शन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 3 =

error: Content is protected !!
Exit mobile version