Home ताज्या बातम्या अजित पवार गटाला मोठा धक्का! मोरेश्वर भोंडवे यांचा शिवसेनेत प्रवेश मातोश्रीवर बांधले...

अजित पवार गटाला मोठा धक्का! मोरेश्वर भोंडवे यांचा शिवसेनेत प्रवेश मातोश्रीवर बांधले शिवबंधन

0

रावेत,दि.१८ ऑक्टोबर २०२४( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- अजित पवारांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. चिंचवड मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.चिंचवड विधानसभा मशाल ला सुटणार असल्याने मोरेश्वर भोंडवे यांनी मशाल हाती घेत उमेदवारी फायनल असल्याचे संकेत दिले आहेत.

मोरेश्वर भोंडवे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पकड मजबूत होण्याचे, संकेत प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष व बोलबाला आतापर्यंत होता. मात्र यापुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा बोलबाला मोरेश्वर भोंडवे यांच्या माध्यमातून दिसणार आहे.त्यामुळे रावेत परिसरात देखील आनंदाचे वातावरण आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven + 10 =

error: Content is protected !!
Exit mobile version