Home ताज्या बातम्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मावळसाठी 44 कोटींचा निधी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मावळसाठी 44 कोटींचा निधी

0

पिंपरी,दि.05 ऑक्टोबर 2024(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्याचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात  शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. आता मावळ विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून 44 कोटी 10 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून पूर, दरड प्रतिबंधक उपयोजना करण्यात येणार आहेत.खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध कामांसाठी निधी मिळण्याकरिता केंद्र, राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. राज्य शासन, पुणे, रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यातून गाव, वस्ती, वाड्यातील, आदिवासी पाड्यावरील अंतर्गत रस्ते करण्यात आले. मावळ विधानसभा मतदारसंघातील पूर, दरड प्रतिबंधक उपयोजना करण्यासाठी निधी मिळण्याकरिता खासदार बारणे यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला. अखेरीस त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामध्ये वाऊंड येथे दरड प्रतिबंधक संरक्षक भिंत बांधण्यासाठी 1 कोटी 59 लाख 7910,  वाडेश्वर 1 कोटी 23 लाख 88 हजार 871, फळणे, फलाने 1 कोटी 2 लाख 38 हजार 987 रुपये, मालेवाडी येथील दरडप्रवण क्षेत्राची उपाययोजना करण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याकरिता 1 कोटी 51 लाख 45 हजार 799, वाकसाई  देवघर येथील संभाव्य दरड संरक्षक भिंत बांधण्यासाठी 2 कोटी 69 लाख 46 हजार, आतवणसाठी 96 लाख 57 हजार, साई येथील भिंत बांधण्यासाठी 91 लाख 5945, वाकसाई येथे राखून ठेवणारी भिंत बांधण्यासाठी 2 कोटी 69 लाख 45 हजार 695,  शिलाठाणे 1 कोटी 16 लाख 67 हजार 933, पांगळोली 45 लाख 49 हजार 889, पाटण 1 कोटी 53 लाख 70 हजार 915, दुधीवारे 7 कोटी 64 लाख 68 हजार 228, भाजे 7 कोटी 64 लाख 68 हजार 288, मोरवे 60 लाख 11 हजार 451, वेरगाव 2 कोटी 63 लाख 53 हजार 23, तुंग येथील राखून ठेवणारी भिंत बांधण्यासाठी 4 कोटी 61 लाख 2544, भोईनीतील आरसीसी भिंत बांधण्यासाठी 4 कोटी, दसवे येथील  13 कोटी रुपयांचा असा एकूण  44 कोटी 10 लाख 89 हजार 431 निधी मिळाला आहे.मावळमध्ये मोठ्या प्रमाणात दरडी, पूर प्रवण क्षेत्र आहेत. पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. या दुर्घटनेत मृत्यु होतात. पावसाळ्यात रस्ते बंद करावे लागतात. त्यामुळे दरडीची दुरुस्ती केली जाणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + 10 =

error: Content is protected !!
Exit mobile version