Home ताज्या बातम्या बदल स्वीकारा प्रगती करा – मनोजकुमार डॅनियल एसबीपीआयएम च्या ‘आरंभ’ कार्यक्रमात...

बदल स्वीकारा प्रगती करा – मनोजकुमार डॅनियल एसबीपीआयएम च्या ‘आरंभ’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे स्वागत 

0
पिंपरी,दि. २४ सप्टेंबर २०२४( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी बदल स्वीकारले पाहिजेत तरच प्रगती करता येईल. व्यवस्थापन शास्त्रातील दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात नवनवीन संधी, तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास यश शंभर टक्के मिळतेच. तुम्ही हटके विचार करा आणि विकासाला चालना द्या, असे प्रतिपादन पुणे महा मेट्रोचे उप महाव्यवस्थापक मनोजकुमार डॅनियल यांनी केले.
    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पीसीईटी संचलित एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या २०२४-२६ शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ‘आरंभ २४-२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॅनियल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास एडीएम ग्रुपचे अध्यक्ष परमजितसिंग चढ्ढा,  इन्फोएज इंडियाचे सेल्स उपाध्यक्ष मौलिक शहा, बॉश चासिज सिस्टीम इंडियाचे एच. आर. प्रमुख उदयसिंग खरात, एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते.
    मोठी स्वप्ने पहा. स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचा पाठलाग करा. ध्येयावर लक्ष केंद्रित करून नियमित अभ्यास, आत्मविश्वास, अतिरिक्त ज्ञान आत्मसात करा हे पाच मंत्र आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत, असे परमजितसिंग चढ्ढा यांनी सांगितले.
    ‘उत्कटतेपासून व्यवसायाकडे तुमची आकांक्षा वास्तवात बदलणे’ या विषयावर मौलिक शहा यांनी मार्गदर्शन केले.
     उदयसिंग खरात यांनी कठोर परिश्रम घेतले तर यश हमखास मिळते. त्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे. कौशल्य विकसित केली तर रोजगार, स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे सांगितले.
    दुपारच्या सत्रात वहिदा पठाण, अर्पिता घोष यांनी मार्गदर्शन केले व शंकांचे निरसन केले.
    स्वागत, प्रास्ताविक डॉ. किर्ती धारवाडकर यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. प्रणिता बुरबुरे तर आभार डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी मानले.
     पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − nine =

error: Content is protected !!
Exit mobile version