पुणे,दि.२९ ऑगस्ट २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- “अण्णा भाऊ साठे यांनी महाराष्ट्रीय आणि भारतीय लोकसंस्कृतीचे उदात्त दर्शन आपल्या साहित्याद्वारे केले आहे. त्यांनी ‘प्रथम माय भू चरणा ‘हे कवन लिहून पहिले नतमस्तक हे मातृभूमीला केले पाहिजे अशी भूमिका स्पष्ट केली आहे.’ ही मातृभूमी म्हणजे भूगोलातल्या जमिनीच्या भूखंडाच्या तुकडा इतपत मर्यादित नाही.तर ही मातृभूमी ही विविधतेनी नटलेली भारतीय संस्कृतीत वैभवशाली परंपरा घेऊन उभा राहणारी मातृभूमी आहे. म्हणून अण्णा भाऊ या मातृभूमीला पहिल्यांदा नतमस्तक होतात.
खरतर लोकसंस्कृती परंपरागत असते. त्या संस्कृतीतूनच मानवी समाज घडत असताे. मानवी समाजाला सांस्कृतिक आयाम लोकसंस्कृतीमुळे येत असतो. अण्णा भाऊ साठे हे भारतीय संस्कृतीचे विकृतीकरण करत नाही. ते भारतीय संस्कृतीचा गौरव हा रशियात करतात.भारतात विविधता जरी असली तरी भारतीय संस्कृतीमध्ये सांस्कृतिक समन्वयाची मोठी ताकत आहे. भारतीय संस्कृतीबद्दल अण्णा भाऊंना नितांत आदर होता हे त्यांच्या रशियात गायलेल्या पोवड्यावरुन तर कळतेच पण त्यांच्या अनेक कथा कादंबरीतून सुध्दा स्पष्ट होते.
त्यांची साहित्य निर्मिती ही भारतीय सांस्कृतिक आचार संहिता पाळून निर्माण झालेली आहे असे दिसते त्याचे कारण भारतीय संस्कृतीचे विकृतीकरण करत नाही. ते संकृतीवर कठोर व टोकाची टिका करत नाहीत.संस्कृतीचा आदर ठेवून आपल्या साहित्याची निर्मिती करतात. भारतीय संस्कृतीत आढळणारी श्रद्धा, आचार,देव,धर्म यांच्या व्यवस्थेंचा अभ्यास हा त्यांचा चांगला होता. म्हणून ते फकीरा कादंबरीतील जोगणीच्या यात्रेचे संघर्षचित्रण करत असताना आदरपूर्वक आणि राष्ट्रवादी भुमिकेतून करतात. संस्कृतीतील लोकधर्म, आचारधर्म, श्रद्धाधर्म यांना ते तडा न देता त्यांचे वास्तववादी दर्शन वाचकाला करून देतात. फकीरा कादंबरीचे उदाहरण याठिकाणी घेता येईल. लोकसंस्कृती ही अनेक घटकातून निर्माण झालेली असते. त्यापैकी कला, लोककला,साहित्य हे त्याचे काही घटक आहेत. कला लोककला आणि साहित्याबद्दल अण्णाभाऊंची भूमिका ही वंदनीय आहे.’ कला ही सदैव काळजाला भिडणारी असली पाहिजे.’ तिला भाषा,प्रदेश यांची सीमा आड येत नाही.अशी भूमिका मांडणारे अण्णाभाऊ कला,लोककला आणि साहित्याकडे पाहताना साहित्य, कला आणि लोककला हे मानवाला जोडण्यासाठी असल्या पाहिजे तोडण्यासाठी असातच कामा नाही. अशी त्यांची धारणा साहित्यीक भूमिकेतून पाह्याला मिळते.”असे मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे हे प्रतिकार न्यूज मुख्यसंपादक तथा रि.पा.ई.व्यापारी आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.माणिक पौळ,यांच्यावतीने आयोजित केलेल्या साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विधानपरिषदेवर निवडून आल्याबद्दल आमदार अमित गोरखे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर आमदार अमित गोरखे, माजी महापौर राहुल जाधव, मा.कार्तीक लांडगे, मा.निलेश बोराटे, गणेश सस्ते, मा.निखील बोऱ्हाडे, डॉ.धनंजय भिसे , मा.सचिन वाघमारे,संदीपान झोंबाडे,भाऊसाहेब आडागळे ,नाना कांबळे, गणेश कलवले ,इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.यावेळी दहावी बारावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या करण्यात आला.त्याचप्रमाणे कलिंदर शेख,शहनाज कुले, देवा भालके,बापूसाहेब गोरे,वंदना जाधव, मनोहर गोरगले,दादाराव आढाव,नंदकुमार जाधव,मुकेश जाधव इत्यादी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
भोसरी विधान सभेचे विद्यमान आमदार महेश दादा लांडगे यांच्या मातोश्री च्या नावाने हिराबाई किसनराव लांडगे आदर्श माता सन्मान गुणगौरव वितरण करण्यात आला ,व आदर्श पञकार सन्मान पुरस्कार ,गुणवंत विद्यार्थी सन्मान पुरस्कार , वितरण करण्यात आले,
तर सामाजिक रक्षा बंधन व अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिलाभगिनीनां साडी वाटप करण्यात आले .यावेळी अमितजी गोरखे ,संदिपान झोंबाडे, प्रवक्ते,राजेश दिवटे,भाऊसाहेब आढागळे, प्रेम जगताप, विठ्ठल चांदणे, बाबुभाई पाटोळे, किशोर सुर्यवंशी, सौ.अर्चनाताई गायकवाड,गीतांजलीताई भस्मे, जयश्रीताई जैद, अश्विनी टेमकर, सौ विजया आल्हाट, आशाताई पवार, सविताताई आव्हाड, इत्यादीं माण्यवर उपस्थित होते व आपले मनोगत व्यक्त केली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिक (भाऊ)पौळ यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम खेडेकर,यांनी केले तर आभारगणेश कलवले, यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोशी येथील महिला कार्यकर्त्या कल्पना शिंदे, शालन शिंदे,विजया सुधारे,सुरेखा सुधारे,रंजना, कांबळे,सोनाली ताई, मिनाताई पखाले गोदा साळवे, सौ. रंजना विर, सौ.कांताबाई तुपसुंदर, सविता ऊपाडे, या सर्व महिला कार्यकर्तांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.