Home ताज्या बातम्या मुकाई चौक-२३ पिडित कुटुंबाचा रस्त्याचा प्रश्न अजुनही प्रलंबित प्रशासनाकडुन उदासिनता अंदोलन चिघळण्याची...

मुकाई चौक-२३ पिडित कुटुंबाचा रस्त्याचा प्रश्न अजुनही प्रलंबित प्रशासनाकडुन उदासिनता अंदोलन चिघळण्याची शक्यता??

0

किवळे,दि.२८ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना सुरु केली माञ लडक्या बहिणीचा वहिवाटीचा जाण्यायेण्याचा रस्ताच थेट अडवला आहे.हा प्रकार खासदार श्रीरंग बारणे यांच्या मावळ लोकसभेत व शहरध्यक्षाच्या जवळच्या भागात घडला आहे.विशेष म्हणजे मुख्यंञी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवासेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस यांच्या नेतृत्वात रस्त्यासाठी अंदोलन चालु आहे.


मुकाई चौक या ठिकाणी गेले सहा दिवसा पासुन बेमुदत धरणे अंदोलन चालु असुन पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन,पोलिस प्रशासन,व तहसिल प्रशासन उदासिन दिसुन येत आहे.राजकीय पुढारी देखील अंदोलनास मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.त्यामुळे सर्वच शहरात बातमी झपट्याने पसरत आहे,शेतकरी उत्तम तरस यांनी २३ कुंटुबांचा जाण्यायेण्याचा वहिवाटीचा रस्ता आडवल्याने संतप्त नागरिक हे मुकाई चौक या ठिकाणी फुले,शाहु आंबेडकर विचारमंच चे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे,राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन यांच्या नेतृत्वात हे अंदोलन सुरु आहे.पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन व जागा मालक शेतकरी उत्तम तरस व त्यांचे भावकी बंधु रोहीदास तरस यांच्या मध्ये रस्ता संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेआहे माञ पिडित कुंटुब यांच्यामध्ये मध्यस्थीचा मार्ग लवकर निघण्यावर अद्याप तरी कोणतीही माहिती प्राप्त नाही.

माञ जागा विकली तर रस्ता पण हा द्यावा लागेल व खरेदी खता मध्ये रस्ता दाखवला आहे.त्या प्रमाणे रस्ता न दिल्याने पिडित कुंटुबांची फसवणुक व डांबुन ठेवण्याचा हा प्रकार दिसतो आहे.त्यामुळे सोमवार पासुन अन्नत्याग अंदोलन करणार असल्याचे अंदोलन कर्ते धर्मपाल तंतरपाळे यांनी माहिती दिली.सोमवारी मार्ग जर नाही मिटला तर अंदोलन तिव्र करणार असल्याचे म्हटले जात आहे.तसेच उत्तम तरस यांचे कुटुंब व त्यांच्या सहकारी यांच्यावर फसवणुकीचे व विविध गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पिडित कुंटुब यांनी अजुन किती अन्याय सहन करायचा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.
लवकर मार्ग निघणार का?संबधित प्रकार हा चिघळण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे,अशी माहिती सुञाकडुन प्राप्त झाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 + 16 =

error: Content is protected !!
Exit mobile version