Home ताज्या बातम्या उपमुख्यमंञी अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बापु कातळे यांनी सफाई कर्मचार्‍यांना केले छञी वाटप

उपमुख्यमंञी अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बापु कातळे यांनी सफाई कर्मचार्‍यांना केले छञी वाटप

0

किवळे,दि.२३ जुलै २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-उपमुख्यमंत्री मा.श्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विकासनगर किवळे,रावेत प्रभाग १६ मधील सफाई कर्मचारी व कचरा वेचकांना छत्री वाटप करण्यात आले, बापु दिनकर कातळे संकल्प सोशल फाउंडेशन च्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला होता.

ऊन,पाऊस, किंवा थंडी असो,अविरत आपले कर्तव्य बजावणारा हा घटक म्हणजे आरोग्य विभाग सफाई कर्मचारी,सफाई कर्मचारी आपल्या परिसरातील सार्वजनिक रस्ते, स्वच्छतागृह, ड्रेनेजची प्रामुख्याने स्वच्छता करतात भर पावसात काम करणाऱ्या या सफाई कर्मचार्‍यांना पावसापासून संरक्षण मिळण्याच्या हेतु ने युवा नेते बापु दिनकर कातळे यांनी सर्व सफाई कर्मचारी यांना मोफत छत्रीचे वाटप केले.यावेळी सोशल फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three + sixteen =

error: Content is protected !!
Exit mobile version