Home ताज्या बातम्या भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ महावितरण अधिकाऱ्यांकडून दादागिरी !तीव्र निषेध !महावितरण मध्ये नेमक चालय काय?

भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ महावितरण अधिकाऱ्यांकडून दादागिरी !तीव्र निषेध !महावितरण मध्ये नेमक चालय काय?

0

पिंपरी,दि.२८ मे २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी): -महावितरणची मंजुरी नसताना प्राधिकरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि तळवडे शाखा अभियंता यांनी संगनमताने भ्रष्टाचार करीत ४० घरगुती व व्यापारी वीज जोड देऊन त्यापोटी प्रति कनेक्शन निर्धारित रक्कम भरुन न घेता कमी शूल्कात वीज जोड दिले आणि अधिकारी, शाखा अभियंता यांनी संगनमताने महावितरणचे आर्थिक नुकसान केले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी अधिकारी व अभियंते यांच्यावर फौजदारी खटले दाखल करावेत, अशी मागणी पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने महावितरणकडे केली होती. त्यावर प्रशासनाने माहिती अधिकारात उजेडात आलेल्या भ्रष्टाचाराची दखल घेत तळवडे शाखा अभियंता रमाकांत गर्जे याच्यावर जुजबी कारवाई करीत त्याला सेवेतून निलंबित केले. त्यामुळे कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता हेरून उर्वरित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनी कोणतीही परवानगी न घेता विनानोटीस आज सोमवारी (दि. १७) रोजी भोसरी महावितरण येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातील केबिनमध्ये बसून ठिय्या मांडत आंदोलन केले. कारवाई टाळण्यासाठी अथवा फाईल बंद करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांवर दबाव निर्माण केला. त्यांना कार्यालय सोडून कुठेच जाता न आल्याने आज दिवसभराचे सर्व कार्यालयीन कामकाज ठप्प झाले.

महावितरणच्या ‘कर्मचारी युनियन’मधील अधिकाऱ्यांची ही खेळी पिंपरी-चिंचवड शहर संघटक शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तथा वीज कर्मचारी अभियंता सेनेचे प्रादेशिक सल्लागार संतोष सौंदणकर यांनी उघडकीस आणली. भ्रष्ट अभियंत्याला समर्थन देत कातडी वाचवीण्याचा त्यांचा बेकायदेशीर कारभार चहाटयावर आणला. भोसरीतील कार्यकारी अभियंता यांच्या दालनाबाहेर आज सोमवारी आंदोलन करीत या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गिरीश बक्षी, सचिव नितीन बोंडे, उपाध्यक्ष मनोज हरपळे, कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर, सचिव संजय पाटील, मनोज सचवाणी, सुरज भराटे, महेश माने, संजय मोरे, प्रशांत महाजन, मनिष शेळके, किशोर पाटील, विजय अर्जुन आदी उपस्थित होते. यावेळी ‘भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय, खाली डोक वर पाय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

याबाबत संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘महावितरण कर्मचारी युनियन’ ही भ्रष्ट अभियंत्याला समर्थन देण्यासाठी आंदोलन करत आहे. हे म्हणजे “कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार झाला. मुळात हे आंदोलन म्हणजे आणखी दोन अभियंते जे की स्पष्टपणे या सगळ्या भ्रष्टाचारात सामील आहेत, त्यांना वाचवायला आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे. भ्रष्टाचाराच्या साखळीत सामील त्यातली एक महिला अधिकारी महावितरणमधून बेदखल केलेल्या संचालकाला कशी मॅनेज करून आली? हे सगळे उघड असल्याने महावितरणने सगळ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना बडतर्फ करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

महावितरणातील  भ्रष्टाचाराने नागरिक त्रस्त आहेत. पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने सामाजिक कर्तव्य म्हणून तळवडे भागातील भ्रष्टाचार उजागर केला आहे. त्याला सामान्य नागरिकांनी समर्थन दिले, असे असताना महावितरण कर्मचारी जे की भ्रष्टाचाराची साखळी चालवतात त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालायचे धोरण ठेवले असल्याचे या प्रकारावरून दिसून येते. एक एक नवीन वीज जोडणी द्यायला यांचे रेट ठरलेले आहेत. २० एचपी नवीन वीज जोडणी फाईलला सहायक अभियंता यांचे दर ५ ते ७.५ हजार आहेत. लोड नसल्याचे कारण देत फाईलला २० ते २५ हजार देखील मागितले जातात, अशा काही संघटनेच्या तक्रारी आहेत. २० एच पी ते ६५ एच पी साठी २५ हजार रुपये सहायक अभियंता मागणी करतो. त्याच फाईलला मंजुरीचे अधिकार असलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याचे दर ५० हजार रुपये असल्याच्या तक्रारी आहेत. २०० एच पी पर्यंत फाईलला एक ते दीड लाख रुपये मागितले जातात, अशाही तक्रारी आहेत. लोड मॅनेज करण्याच्या नावाखाली सामान्य ग्राहकांची लाखोंची लूट अधिकारी करतात आणि त्याच्या विरोधात प्रशासनाने पावले उचलली की लगेच यांच्यातले भ्रष्टाचाराचे भूत जागे होत, अशी कारवाई थांबायला भाग पाडतात. मुळात आंदोलन करायला नोटीस द्यावी लागते. जी दिली नसून यांचा एक दिवसांचा पगार कापून त्याची नोंद सेवा पुस्तिकेत घेतली जाणे गरजेचे आहे. अशा मुजोरी विरोधात जनतेनेच  यांना धडा शिकवायची खरी गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

महावितरण कंपनी प्रशासनाने केवळ एका अधिकाऱ्याला निलंबित करून प्रकरण दाबायचा केलेला हा प्रयत्न आहे. याउलट प्राधिकरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्नेहलता हंचाटे आणि कनिष्ठ अभियंता विनायक शिंदे यांनाही सेवेतून बडतर्फ करून समाजापुढे आदर्श घालून दिला पाहिजे. दरम्यान  हंचाटे यांची नियुक्ती नियमबाह्य पद्धतीने भ्रष्टाचार करून झाली आहे. ज्याची चौकशी होणे गरजेचे आहे. हंचाटे यांनी अनैतिक मार्गाने प्राधिकरण उपविभाग या ठिकाणी बदली करून घेतली असल्याने त्यांनाही सेवेतून बडतर्फ केले जावे. याशिवाय या अधिकाऱ्यांची भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून चौकशी केली जावी. तसेच प्रत्येक अधिकाऱ्याने भ्रष्ट मार्गाने जमा केलेल्या करोडो रुपयांच्या संपत्तीला शासन दरबारी जमा करून घेतले जावे. तळवडे प्रकरणात यांच्यावर गुन्हे दाखल केले जाण्याची आवश्यकता आहे. यांच्या सर्व चल आणि अचल संपत्तीला तातडीने नागरिकांमध्ये वितरीत केले जावे. जेणेकरून सामाजिक समतोल राखला जाऊ शकेल, असे या पत्रकात त्यांनी म्हटले आहे.’

‘ भोसरी महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आज सोमवारी केबिनमध्ये ठाण मांडून ती बंद केली. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांना बाहेर पडता आले नाही. तळवडे शाखा अभियंता रमाकांत गर्जे यांनी अधिकारांचा गैरवापर करून महावितरणचे आर्थिक नुकसान केले. सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा पडत असताना हे अधिकारी महावितरणचे नुकसान करत आहेत. त्याची तक्रार माहिती अधिकारात माहिती घेऊन इलेक्ट्रिक असोसिएशनने केली होती. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची पाठराखण हे अधिकारी करीत आहेत. महाराष्ट्रात हे चाललय काय? याबाबत मुख्यमंत्री, उर्जामंत्री यांना निवेदन देत अधिकाऱ्यांसह अति. कार्य. अभियंता, सहायक अभियंता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.                                                  – मा. संतोष सौंदणकर, कार्याध्यक्ष – पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन…

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven + seventeen =

error: Content is protected !!
Exit mobile version