रावेत,दि.१७ मे २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- गेल्या आठ वर्षापासून रावेत-किवळे मुकाई चौक या ठिकाणी दोन्ही साईडला फुटपाथ आहे. त्यावर पथारी धारक आपला व्यवसाय करीत आहे. फुटपाथला लागूनच सदर रामदयाल गुप्ता व त्यांचे बंधु नामक यांचा प्लॉट आहे.महानगर पालिकेने रावेत हद्दीत अतिक्रमण कारवाई केली मग रावेत च्या हाद्दीतील कोपरा का सोडला,हि बाब देखील पालिका प्रशासनाकडे संशय बळावत आहे.सदर प्लॉट मालक हा तेथील फुटपाथ वरील पथारी व्यावसायिकांना त्रास देत असल्याचे पञ पोलीस आयुक्त तसेच डीसीपी, एसीपी रावेत पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.सर्व व्यावसायिक यांनी गुप्तांच्या त्रासाला कंटाळून पोलिसांकडे धाव घेतली आहे. गुप्ता फुटपाथ लगतच जागामालक असुन आरक्षित जागा व बॅंकेच्या गैरव्यवहारात अडकलेले इसम सदर बँकेने देखील जागेची पाहणी न करता गुप्ता यांना कशाप्रकारे लोन दिले व आरक्षित जागेवर कसे लोन दिले हा ही प्रश्न संशयाकडे वळतो त्यामुळे सदर बँक प्रशासनाची देखील फसवणूक केल्याचे दिसत आहे. सदर बँक अडचणीत असल्याने बँकेने मारलेल्या कंपाउंड देखील गुप्ताने काढले आहे. असे तेथील व्यापाऱ्यां मध्ये चर्चा आहे, फुटपाथ सरकारी आहे आणि फुटपाथचे भाडे गुप्ता…… मागत आहे.
त्यामुळे गुप्तावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सर्व पथारी व्यापारी यांची मागणी आहे.फुटपाथवरच्यांना दमदाटी आणि शिव्या देत आहे.जागा भाड्याने घ्या अन्यथा फुटपाथ वरचे भाडे द्या..
सदरची घटना पथारी प्रमुख अध्यक्ष म्हणुन दत्ता गायकवाड यांच्या कानावर टाकले असता,फुटपाथवरचे भाडे देऊ नका सरकारी जागेचे भाडे कुणाला मागण्याचा अधिकार नाही असे सर्वांना गायकवाड यांनी सांगितल्याने व्यापारी आघाडीचे अध्यक्ष म्हणुन दत्ता गायकवाड विरुद्ध खोटे अर्ज करुन ञास देण्याच्या हेतुने गुप्ता वागत आहे.तसेच काही पोलिस अधिकारी देखील गुप्ता यांना मदत करत आहेत. त्यामुळे सर्व दुकानदार भयभित आहेत. ५००/-रु रोजचे मागत आहेत.यामुळे अशा दमदाटी करुन हप्ते मागणार्या टोळी विरुद्ध कारवाई करुन व्यापार्यांना भयमुक्त करावे अशी मागणी मुकाई संघटना व्यापारी संघटनेच्या वतीने पोलिस आयुक्तांन कडे करण्यात आली आहे.कारवाई न झाल्यास पथारी व्यापार्या कडुन अंदोल करण्यात येईल असे व्यापार्याकडुन सांगण्यात येत आहे.त्यामुळे पोलिस प्रशासन व महानगर पालिका काय कारवाई करणार या कडे सर्वाचे लक्ष लागुन आहे.