Home ताज्या बातम्या मशाल च्या प्रचारफेरित महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग

मशाल च्या प्रचारफेरित महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग

0

पिंपरी , दि. ०१ एप्रिल २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी ) – पिंपरी गावातून आज सकाळपासूनच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ वाघेरे पाटील यांच्या पत्नी पिंपरी चिंचवड महापलिकेच्या माजी नगरसेविका उषाताई संजोग वाघेरे पाटील यांनी प्रचारफेरीत नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या. या वेळी महिलावर्गाकडून त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. या प्रचारफेरीत महिला स्वतःहून उत्स्फूर्तपणे सामील झाल्या होत्या. या सर्वांनी एकत्र येत मोठ्या जल्लोषात उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार केला.

‘संजोग वाघेरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘येऊन येऊन येणार कोण? संजोग वाघेरे पाटील पाटलानशिवाय दुसरं आहेच कोण?’ अशा जोरदार घोषणांनी देत महिलांनी परिसर दणाणून सोडला. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत पिंपरी गावातील महिलांची गर्दी यावेळी मोठी पहायला मिळत होती. उमेदवार संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून प्रचारात मोठी आघाडी घेतली असून त्यांना समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिलावर्गातही त्यांना मोठे स्थान असून त्या वाघेरेंचा प्रचारार्थ मोठ्या उत्सहात सहभागी होत आहेत.
पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कालभैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर, न्हावेआळी, वाघेरे कॉलोनी, सौंदर्य गणेश मंदिर, सौंदर्य चौक अश्या विविध भागातून प्रचार -याली काढण्यात आली. माजी नगरसेविका उषा सांजोग वाघेरे, स्नेहा वाघेरे, ज्योती वाघेरे, मनीषा वाघेरे, वासंती शिंदे, रसिका वाघेरे, मनीषा कांबळे, स्मिता वाघेरे, सुनंदा वाघेरे, शारदा वाघेरे, मंगल वाघेरे, लता गायकवाड, शोभा चव्हाण, प्रियांका काटे, भाग्यश्री कापसे, वैशाली वाघेरे, नंदा वाघेरे, नंदा शिंदे, रजनी घुले, रुची कदम, सारिका वाघेरे, शुभांगी वाघेरे, मंजू भरेकर, पुनम वाघेरे आशा कापसे, नंदा गोलांडे, कांचन गोलांडे, साधना गोलांडे, आरती वाघेरे, एकता लूकर, आदिनाथ वाघेरे, प्रणव वाघेरे, शुभम चव्हाण, निशांत शिंदे, स्वयंम शिंदे, साहिल मोरे, केतन वाघेरे, विराज शिंदे, गणेश म्हस्के यांच्यासह महिला कार्यकर्त्या, युवा कार्यकर्ते, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

दरम्यान, भाजप सरकारने जी खोटी आश्वासने दिली त्याच्या विरोधात या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी नागरिकांशी अधिकाधिक प्रमाणामध्ये संपर्क करावा”. असे आवाहन वाघेरे यांच्या पत्नी उषाताई वाघेरे पाटील यांनी मतदारांना केले. या वेळी पिंपरी गावातील विविध महिला बचत गट, महिला, युवक संघटना, विविध समाजाच्या संघटना, परिसरनिहाय कार्यकर्त्यांचा संच यांनी शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा जाहीर देत असून विजयी आपलाच अशा भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 2 =

error: Content is protected !!
Exit mobile version