Home ताज्या बातम्या शिवतारेनी माफी मागितली तर आम्ही काम करु अन्यथा..-अजित गव्हाणे

शिवतारेनी माफी मागितली तर आम्ही काम करु अन्यथा..-अजित गव्हाणे

0

पिंपरी,दि.१९ मार्च २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महायुतीचे नेते एकञ जरी दिसत असले तरी महायुती मध्ये खळबळ पहायवयास मिळत आहे.कारण लोकसभेचे इच्छुक उमेदवारच ऐकमेकांन विरोधात आरोप करत असल्याने युती धर्मच फाट्यावर मारत आहेत असे चिञ सर्वञ दिसत आहे.
महायुतीमध्ये राष्र्टवादी क्राॅंग्रेस पार्टी अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली अद्याप आजपर्यंत तरी सहभागी आहोत त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा निवडून येण्यासाठी आम्ही युती धर्म पाळत आहोत. मात्र मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे हे उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांच्या विषयी बेताल वक्तव्य करत आहेत
अजित पवार गटाच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी वाढली आहे. पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात तातडीचे पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त करण्यात आली.

माजी आमदार विजय शिवतारे हे आमच्या नेत्यावर वारंवार आरोप करतात व बेताल वक्तव्य करतात त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे शिवतारे यांनी माफी मागावी अन्यथा इथल्या उमेदवाराचे काम आम्ही करणार नाही. आमची भूमिका आम्हाला वेगळी घ्यावी लागेल असा इशारा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिला आहे.तसेच भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी मागणी वर देखील ठाम अहोत.

शिवतारेना जसा आक्रमकतेने विरोध करताय तसा भाऊसाहेब भोईरांच्या उमेदवारी संदर्भात आक्रमकता दिसत नाही असा प्रश्न पञकारांनी विचारला असता,त्यावर अध्यक्षांनी अमची कामाची पद्धत वेगळी आहे,आम्ही उमेदवारी मिळावी या मागणी वर कायम अहोत असे सांगितले

चिंचवड विधानसभेचे मागील उमेदवार तसेच माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी भाजपाचे विजयी उमेदवारास कडवी झुंज दिली होती माञ भाजपा व अजितदादा पवारांची राष्र्टवादी महायुतीत असल्याने जर चिंचवड च्या आमदारांच्या घरात भाजपाचे पिपंरी चिंचवड शहरध्यक्षांंना जरी उमेदवारी मिळाली तरी युती धर्म पाळू असे नाना काटे म्हणाले.
यावेळी भाऊसाहेब भोईर नाना काटे अ‍ॅड.गोरक्ष लोखंडे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे,महिला शहरध्यक्षा कविताताई आल्हाट, डी.डी कांबळे, अ‍ॅड.सचिन आवटे, विजय दळवी, विजय लोखंडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − 15 =

error: Content is protected !!
Exit mobile version