Home ताज्या बातम्या ‘नांदी’ स्मरणिकेतून १०० वर्षातील नाट्य संमेलन अध्यक्षांच्या कारकीर्दीला मिळाला उजाळा

‘नांदी’ स्मरणिकेतून १०० वर्षातील नाट्य संमेलन अध्यक्षांच्या कारकीर्दीला मिळाला उजाळा

0

पिंपरी,दि.६ जानेवारी २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे शनिवारी चिंचवड, श्री मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे दिमाखदार सोहळ्यात उद्धघाटन झाले. या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने एक वैशिष्ट्यपूर्ण स्मरणिका तयार करण्यात आली आहे. १०० व्या नाट्य संमेलनाचे औचित्य साधून या स्मरणिकेत आजवर झालेल्या १०० नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला आहे. ‘नांदी’ असे या स्मरणिकेला नाव देण्यात आले असून १०० व्या नाट्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी याचे अनावरण करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्ष अध्यक्ष शरद पवार, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, उद्योगमंत्री उदय सामंत,१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाटय संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर,अभिनेते मोहन जोशी, अशोक हांडे, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे , कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल,
खासदार श्रीरंग बारणे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, आ. उमा खापरे, अण्णा बनसोडे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
स्मरणिके विषयी बोलताना नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य सुहास जोशी यांनी ही स्मरणिका ३० दिवसांपेक्षाही कमी दिवसात पूर्ण केली आहे. या स्मरणिकेत १०० नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला आहे. या सर्व नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या फोटोंचा देखील यामध्ये समावेश आहे. एका नाट्य रसिकाकडे १९६६ पासून नाटकाच्या तिकिटाचा संग्रह आहे. त्या नाटकाच्या तिकिटांचे कोलाज देखील आहे. तसेच पंडित नंदकिशोर कपोते यांचा ‘नाटकातील नृत्याचे महत्व’ या विषयांवरील लेख, त्याच प्रमाणे लावणी सांम्राज्ञी संजीवनी मुळे – नगरकर यांचा ‘नाटकातील लोक कलेच महत्व’ असे लेख आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, पद्मश्री गिरीष प्रभूणे, पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त शेखर सिंह आयुक्त, नाटकार, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांचेही लेख ‘नांदी’ मध्ये आहेत. याशिवाय मधु जोशी यांचा सांस्कृतिक मागोवा हा लेख, संगीत रंगभूमीच्या अभ्यासक डॉ. वंदना घांगुर्डे यांचा ‘संगीत रंगभूमी व मराठी नाटक’ हा लेख आहे. गेली ६२ वर्ष राज्यात महाराष्ट्र शासनाची राज्य नाट्य स्पर्धा सुरू आहे. यावर प्रकाश टाकणारा एक लेख पि. डी. कुलकर्णी यांचा आहे. तसेच ‘गाढवाचं लग्न’ फेम वसंत अवसरिकर यांचा लेख आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वाटचालीचा देखील लेख यामध्ये आहे. मुखपृष्ट प्रसिद्ध नैपथ्यकार प्रदीप मुळे यांनी तयार केले आहे. १०० वे नाट्य संमेलन असल्याने तंजावरमध्ये झालेल्या पहिल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांपासून आज पर्यंतच्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांपर्यंतचा इतिहास व नाट्य संमेलनाचा प्रवास यामध्ये आहे. ही स्मरणिका स्मरणात राहणारी आणि संग्रही ठेवणारी झाली आहे.
————————————

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 4 =

error: Content is protected !!
Exit mobile version