Home ताज्या बातम्या पीसीसीओईची ‘हॅकाथॉन २०२३’ वर मोहर !!! हैद्राबाद येथील महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांकसह...

पीसीसीओईची ‘हॅकाथॉन २०२३’ वर मोहर !!! हैद्राबाद येथील महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांकसह एक लाखाचे पारितोषिक पटकावले

0

पिंपरी,दि.२९ डिसेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या ‘हायड्रोमाइनेक्स’ संघाने भारत सरकारद्वारे आयोजित आणि नल्ला मल्ला अभियांत्रिकी महाविद्यालय, हैद्राबाद, तेलंगणा यांच्या सहकार्याने आयोजित ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२३’ च्या महाअंतिम फेरीत प्रथम पारितोषिक पटकावले.

   पीसीईटीच्या संघाने ‘डिफिकल्टी इन ऑपरेटिंग हेवी अर्थ मूव्हिंग मशिनरीज ड्यूरिंग द रेनी सीजन’ या समस्येचा अभ्यास करून अभिनव प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाला खाण मंत्रालयाच्या अंतर्गत हार्डवेअर प्रकारात एक लाख रुपयांचे पहिले पारितोषिक मिळाले. हायड्रोमाइनेक्स संघाचे नेतृत्व इ ॲण्ड टीसी विभागाच्या कौशल लवांडे याने तर आंचल गुल्हाने, अदिती चंदनवार, प्रथमेश चव्हाण, यश जाधव आणि संगणक विभागातून प्रथमेश चौगले यांचा समावेश होता. एनएमआरसीचे अध्यक्ष नल्ला मल्ला रेड्डी, संचालक डॉ. दिव्या नल्ला, खाण मंत्रालयाचे सदस्य राजेश विंचूरकर, एनएमआरसीचे प्राचार्य डॉ.एम.एन.व्ही. रमेश यांच्या हस्ते विजेत्या संघाला गौरवण्यात आले.
   संघ मार्गदर्शक डॉ. वर्षा हरपळे, प्रा. प्रमोद सोनवणे, प्रा. वैशाली पाटील, डॉ. महेश कोलते विभाग प्रमुखांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे यांनी अभिनंदन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 − five =

error: Content is protected !!
Exit mobile version