Home ताज्या बातम्या १४ ऑक्टोबर २०२३ ला पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होतोय धम्मचक्र...

१४ ऑक्टोबर २०२३ ला पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होतोय धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव

0

पिंपरी-चिंचवड,दि.०८ ऑक्टोबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा हा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि/किंवा १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर सह सर्वञ स्थानिक बौद्ध स्थळांवर व शहरात गावात साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन अभिवादन करतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत “धम्मचक्र प्रवर्तन” केले; तेव्हापासून हा दिवस “धम्मचक्र प्रवर्तन दिन” म्हणून साजरा केला जातो.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढली आहे,तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल अशी कृती करावयास आता तुम्ही शिकले पाहिजे आणि हे आपणास साधले तर आपल्याबरोबर देशाचा… इतकेच नव्हे जगाचा… हे उद्धार होणार आहे.
त्याच अनुषंगाने धम्मचक्र महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर दरवर्षी कार्यक्रम घेत असते.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव समिती २०२३, पिंपरी चिंचवड शहर आयोजित महासूर्याचे धर्मांतर (आठवण धर्मांतराची) दरवर्षी प्रमाण यंदाच्या वर्ष ही कार्यक्रम होत आहे.कार्यक्रमात पूज्य भंते राजरत्नजी यांची धम्मदेसना व डाॅ. गणेश चंदनशिवे (बाजीराव मस्तानी फेम), प्रबुद्ध जाधव (मुंबई स्टार प्रवाह मी होणार सुपरस्टार फेम), पूजा सावंत सुप्रसिद्ध गायिका मुंबई यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता,स्थळ-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर पिंपरी पुणे 18 या ठिकाणी होणार आहे.

या कार्यक्रमास विशेष सहकार्य-गवळी मंडप अँड डेकोरेटर्स,प्रजेचा विकास (न्यूज पेपर व ऑनलाईन न्यूज चॅनल), आकाश इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी /द रॉयल इव्हेंट्स,अमोल असोसिएट्स अँड लुंबिनी फिल्म प्रोडक्शन तर कार्यक्रमाचे आयोजक- नितीन गवळी, विनय बोरकर, अमोल आवारे, विजय ओहोळ, विकास कडलक, प्रकाश बुक्तर, गणेश आलेगावकर, सागर घनवट,राम भंडारे,आकाश लगाडे, बुद्धभूषण गवळी, सुरेश खरात यांनी केले असून धम्मचक्र महोत्सव समितीचे नितीन गवळी, विनय बोरकर व अमोल धावरे यांनी समितीच्या वतीने अहवान केले आहे,की आपण डाॅ. बाबासाहेबांच्या धर्मांतराची आठवण सतत स्मरणात राहावी ह्या उद्देशाने आपण हा धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव घेत असतो.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण लाखोच्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहावे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 + 8 =

error: Content is protected !!
Exit mobile version