पिंपरी,दि.०६ ऑक्टोबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- अशोक सर्वांगीण विकास सोसायटी व अशोक नागरी सहकारी बँकेचे संस्थापक स्मृतिशेष डॉ. अशोकभाऊ शिलवंत यांच्या तृतीय स्मृतिदिनाचे औचित्य साधून डाॅ.अशोक शिलवंत यांच्या नावाने पुरस्कार वितरण सोहळा आणि त्यांच्या आंदराजंली पर अभिवादन सभा सोमवार दिनांक: ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. होणार आहे.कार्यक्रम स्थळ-आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी, या ठिकाणी मोठ्या संख्येन होणार आहे.आपण ही त्यात सहभागी व्हावे असे अहवान अॅड. राजरन्त अशोक शिलवंत यांनी केले आहे.आचार्य रतनलाल सोनाग्रह यांनी पञकार परिषदेत बोलताना म्हणाले अशोक शिलवंत यांचे विचार पुढे जोपासण्याचे काम सुलक्षणा आणि राजरन्त करत आहेत. डॉक्टर अशोक शिलवंत नेहमी म्हणत असायचे की मेल्यानंतर कोणीही कौतुक करते मानसन्मान मान देते पण आपण त्यांच्या कामाचे कौतुक जिवंतपणी करायचे त्यामुळे शिलवंत यांनी हयात असतानाच पुरस्कार सोहळयाची सुरुवात केली.
या कार्यक्रमाचे धम्मविधी वंदनीय भन्ते राजरत्न यांचे हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष श्री. श्रीपाल सबनीस हे आहेत. पुरस्कर्त्यांना पुरस्कार साताऱ्याचे विद्यमान खासदार श्री. श्रीनिवास पाटील साहेब यांचे हस्ते देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील साहेब, आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार श्री. सचिन ईटकर ६ व्या धम्मसंगीतीचे अध्यक्ष श्री. रतनलाल सोनग्रा सर हे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमामध्ये डॉ. अशोकभाऊ शिलवंत यांच्या नावाने “डॉ. अशोक शिलवंत धम्मदीप पुरस्कार”, दैनिक लोकमतचे संपादक श्री. संजय आवटे यांना देण्यात येणार आहे. “डॉ. अशोक शिलवंत समाज भूषण पुरस्कार” अँड जयदेव गायकवाड मा. आमदार पुणे व मा. भाऊसाहेब डोळस अध्यक्ष बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी- चिंचवड यांना देण्यात येणार आहे. आणि डॉ. अशोक शिलवंत विद्या भूषण पुरस्कार ” हा इंद्रायणी शिक्षण संस्थाचे सचिव मा. चंद्रकांत शेटे यांना जाहीर करण्यात आलेला आहे. “डॉ.अशोक शिलवंत पत्रकार भूषण”, या पुरस्काराने जेष्ठ पत्रकार मा. अरुण खोरे यांना आणि “डॉ. अशोक शिलवंत काव्य भूषण पुरस्कार”, जेष्ठ कवियत्री मा.स्वाती सामक, जेष्ठ कविवर्य माधव पवार- सोलापूर आणि प्रसिद्ध कवियत्री मानसी चिटणीस- चिंचवड यांना देण्यात येणार आहे. तसेच जेष्ठ बौद्ध साहित्यिक बाबा भारती यांनी अनुवादित केलेल्या ‘धम्मपद’ या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे पुस्तक प्रकाशन मा. श्रीपाल सबनीस यांचे शुभ हस्ते करण्यात येणार आहे. आणि लेणी संवर्धन विहार संवर्धन व समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्थांचादेखील सन्मान करण्यात येणार आहे.
सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या सामाजीक व पुरगामी विचारधारा व माझे वडील यांनी आंबेडकरी विचारधारा सम्राट अशोक यांची विचार धारा चळवळ चालवत होते. तीच चळवळ आम्ही पुढे नेत अहोत.सर्वानी कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती व अहवान देखील केले.या वेळेस पञकार परीषदेस मा. आचार्य रतनलाल सोनाग्रा, महेंद्र भारती, अशोक नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष अॅड. राजरत्न शिलवंत हे उपस्थित होते.