दापोडी,दि.०४ सप्टेंबर २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- प्रजेचा विकास च्या बातमीचा दणका बातमी लागताच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रशासनाने दखल घेत दापोडी मध्यवर्ती कार्यशाळा प्रमुख दत्तात्रय चिकुर्डे यांची तडकाफडकी केली बदली, दापोडी मध्ये कार्यावरती शाळेतून थेट नागपूर मध्यवर्ती कार्यशाळेत बदली करण्यात आली. मात्र पीडित गर्भवती महिलेला न्यायाच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे मध्यवर्ती कार्यशाळेचे नाव अशा वासनांद भ्रष्ट लोकांमुळे खराब होत असल्याने अशा अधिकाऱ्यांना बदली न करता ताबडतोब निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी पीडित महिलेने केले होती,नागपुर मध्येही महिलाना ञास होऊ शकतो.अशा लोकांन कारवाई होणे म्हत्वाचे आहे. मात्र तरीही वरिष्ठ पदाधिकारी व पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे संपूर्ण शहराच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाचे राज्यकर्त्यांचे अद्याप आजही लक्ष लागून आहे.
काय होता नेमका प्रकार
दिवसेंदिवस महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यात पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड शहर ही मागे नाही असाच एक प्रकार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी १२(एस.टी) या ठिकाणी कर्मचारी गर्भवती महिलेसोबत विनयभंग करत लगट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला लघवी करण्यास गेली तरी तिचा पाठलाग करणे,पिडित महिला गर्भवती असून मध्यवर्ती कार्यशाळेत कामास आहे. तेथील मध्यवर्ती कार्यशाळा व्यवस्थापक आरोपी-दत्तात्रय चिकुर्डे व उपअधिक्षक सहकारी शकील सय्यद हे दोघेही वरिष्ठ अधिकारी असून पीडित गर्भवती महिलेला जाणून बुजून ञास देत आहेत. तिच्या मनात लज्जा निर्माण होईल अशा प्रकारे तिच्या वारंवार बाजूला जाऊन कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. असे दाखवून पिडित महिलेला अर्वाच्य शिवराळ भाषेत शिवीगाळी करणे,वासनांद नजरेने भावनेने बघणे,केबिन मध्ये बोलवुन अश्लील भाषेत बोलुन लगट करण्याचा प्रयन्त करणे,तसेच याआधी महिलेला क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अपुरे कपडे देऊन तिच्यावर कारवाई करणे टोमणे मारणे मानसिक त्रास देणे महिलेला पाहून अश्लिल हावभाव करणे असा गैर प्रकार घडत आहे.त्यामुळे सदर पिडित महिला हि तणावात गेली असून पिडित महिलेने राज्य महिला आयोग, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच भोसरी पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार अर्ज दिला होता. मात्र सदर पिडित महिलेची दखल तब्बल एक महिन्यानंतर घेतली व रुग्ण सेवकांच्या मदतीमुळे आरोपी चिकुर्डे व सय्यद यांच्या विरोधात भोसरी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला लैंगिक अत्याचार दक्षता समिती मधील वरिष्ठ पदाधिकारी एका महिलाकडे सदर पिडित महिलेने अर्ज दाखल केल्यानंतर गरोदर असल्याचे पत्र दिल्यानंतर समिती तील महिलेने सदर कागद कोणता दिला आहे. मला समजत नाही अशी वल्गना करत आरोपींना पाठीशी घालून त्यांना सहकार्य सहकार्य केले. जर एक महिलाच दुसऱ्या महिलेची मजबुरी समजू शकत नसेल, तर अशा वेळेस महिला खूप तणावात जातात. सदर पिडित महिलेवर तिच्या घरची जबाबदारी असल्याकारणाने तक्रार करण्यास घाबरत होती. मात्र वासनांद लोकांचे गैरप्रकार थांबायचे नाव घेत नसल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित गर्भवती महिलेने तक्रार दिली, याआधीही कार्यशाळा प्रमुख कारागीर मोहिते यांच्यावरही अशी तक्रार केली होती,त्यामुळे मध्यवर्ती कार्यशाळेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवत असून संपूर्ण शहरात व एसटी महामंडळ कर्मचारी या सर्वांमध्ये आरोपी चिकुर्डे आणि आरोपी सय्यद हे चर्चेचा विषय होत आहे. अशा वासनांद लोकांवर कारवाई केली जावी अशी चर्चा जोर धरत आहे.सदर पिडित महिलेला वारंवार कामावरुन काढुन टाकण्याची धमकी दिली जात आहे.त्यामुळे वरीष्ठ पदाधिकारीच भ्रष्ट आणि वासनांद असल्याने मध्यवर्ती कार्यशाळेचे नाव खराब होत आहे. अशा अधिकाऱ्यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे मात्र वरिष्ठ पदाधिकारी व पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे संपूर्ण शहराचा पदाधिकाऱ्यांच्या प्रशासनाचे राज्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.