Home गुन्हेगारी जगत मी आता भाई आहे,मोक्यामधून सुटुन आलोय… तुला आता संपवून टाकतो, भाईची दहशत

मी आता भाई आहे,मोक्यामधून सुटुन आलोय… तुला आता संपवून टाकतो, भाईची दहशत

0

देहुरोड,दि.३० ऑगस्ट २०२३( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- गुन्हेगारीचे प्रमाण दिवसें दिवस वाढतच आहे. अनेक गुन्हेगारांना शिक्षा होते. सुधारण्यासाठी मात्र गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही, असाच एक प्रकार देहूरोड या ठिकाणी सवाना हॉटेल मध्ये घडला आहे. मित्रांसोबत जेवायला गेलेल्या विनोद दत्तात्रय जगताप राहणार शितळानगर देहूरोड यास सवाना हॉटेल मध्ये जेवायला आलेला व्यक्ती मोक्यातून सुटलेल्या आरोपी सुरज पवार व त्याच्याा साथीदाराने शिवीगाळ करत मारहाण केली. सदर घटना २७ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ९.३० वाजता घडली आहे.

विनोद जगताप व त्याचे मित्र आकाश मिनीगल, स्वप्नील जयवंत राऊत व सनी विजय ठोंबरे असे सर्वजण सवाना हॉटेल सवाना चौक, आधार हॉस्पीटलच्या बाजूला, देहूरोड पुणे येथे जेवणा करीता गेले होते. तेथेच आरोपी भाई सुरज पवार व त्याचे अन्य साथीदार हेही होते. फिर्यादी जगताप सोबत त्या ठिकाणी आरोपी सुरज पवार याने ओळख काढून जगताप यास विचारले तू कुठे राहतो दोघांनी एकमेकाचा पत्ता विचारल्यानंतर सुरज पवार याने जगताप ओट्यावर कोणाला ओळखतो विचारले जगताप यांनी रफिक भाईला ओळखतो असे सांगितल्यानंतर आरोपी सुरज पवार यास रफिक भाई चे नाव खटकले आणि त्याने त्याच्या साथीदारां सोबत मिळुन सर्वान देखत जगताप ला म्हणाला रफिकला भाई का म्हणतो मी आता भाई आहे मी आताच मोक्या मधून सुटून आलो आहे असे म्हणून आरोपी सुरज पवारने फिर्यादी विनोद दत्तात्रेय जगताप याला शिवीगाळ करून रफिकला भाई म्हणतो, तुला आता संपवुन टाकतो असे बोलून जगताप यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने टेबलावर असलेली बाटली डोक्यात उजव्या बाजुला मारली. त्यानंतर आरोपी सुरज पवार चे साथीदार आरोपी दत्ता कटारे, साहिल राऊत,राज पाटील, केतन चव्हाण यांनी मोठमोठ्याने आरडा ओरडा करीत दहशत पसरवत टेबलावरच्या दारुच्या बाटल्या उचलून जगतापच्या डोक्यात मारल्या व विनोद जगताप खाली पडल्यावर आरोपी दत्ता कटारे व केतन चव्हाण याने शिवीगाळ करून लाथा बुक्यानी मारहाण केली. विनोद जगताप यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजि.नं.४८२/२०२३ भादवि कलम ३०७,१४३, १४७,५०४,५०६ प्रमाणे आरोपी सुरज पवार व त्याच्या अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तपासअधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गणपतराव गज्जेवार आणि देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 3 =

error: Content is protected !!
Exit mobile version