Home ताज्या बातम्या घरोघरी विराजमान होण्यासाठी “वेगवेगळ्या मुर्तीतील रुपा”मध्ये बाप्पा सज्‍ज, गायकवाड कुटुंब मूर्ती घडविण्यात...

घरोघरी विराजमान होण्यासाठी “वेगवेगळ्या मुर्तीतील रुपा”मध्ये बाप्पा सज्‍ज, गायकवाड कुटुंब मूर्ती घडविण्यात दंग

0

किवळे,दि.२८ ऑगस्ट २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- गणरायांच्‍या आगमनाची तयारी वेग धरु लागली असून, श्रींच्‍या स्‍वागतासाठी भाविकांमध्ये उत्‍साह बघायला मिळत आहे. घरोघरी विराजमान होण्यासाठी “वेगवेगळ्या मुर्तीतील रुपा”मध्ये बाप्पा सज्‍ज झालेले आहेत.वीर रोनक आटर्स,गणेश मुर्ती गायकवाड कारखाना, पिंपरी चिंचवड शहरातील देहुरोड शहरा जवळील किवळे गाव या ठिकाणी मूर्तीतील बारकावे टिपताना गायकवाड पिता-पुत्र वेगळेपण जपत आहेत. भाविकांकडून सादर छायाचित्राप्रमाणे हुबेहुब शाडूमूर्ती पीओपी मूर्ती साकारण्यावर भर दिला जातो आहे.भाविकांच्या मनातील बप्पाची मुर्ती तयार करताना गौतम गायकवाड व प्रशांत गौतम गायकवाड हे पिता-पुत्र शाडू मूर्ती व प्लास्टर ऑफ पॅरीस ची मूर्ती घडविण्यात सध्या दंग आहेत.

विशेष म्‍हणजे प्रत्‍येक मूर्तीत वेगळेपण जोपासताना भाविकांचा उत्‍साह वाढविण्यास ते हातभार लावतात,

दगडुशेठ,लालबाग,शंकर भगवान,महाराजांची अंबारी,हत्तीवरील महाराजांची अंबारी,भटबैठक, स्‍वामी बैठक, बालगणेश, वरदहस्‍त गणपती, वेलिंग बैठक, महागणपती, महंत गणेश अशा विविध भावमुद्रांमधील गणरायांची सुबक मूर्ती भाविकांच्‍या आकर्षणाचा केंद्र ठरते आहे.श्री.गायकवाड म्‍हणाले, की श्रींच्‍या मूर्तीतील बारकावे टिपताना वास्‍तवदर्शकता आणण्यावर भर दिलेला आहे. प्रत्‍येक मूर्ती इतरांपेक्षा वेगळी राहील, याची खातरजमा केली जाते असल्याचे गौतम गायकवाड यांनी सांगितले.

सदर बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी गायकवाड कुटुंब गेले २३ वर्षापासून बाप्पाच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्ती बनवण्यावर भर देत आहेत.गौतम गायकवाड,पन्ती मंगला गौतम गायकवाड,प्रशांत गौतम गायकवाड,अमृता प्रशांत गायकवाड,वीर प्रशांत गायकवाड, रोनक प्रशांत गायकवाड,भाव्या आणि कौस्तुभ,गवस पेंटर,सुलतान पेंटर,अक्षय पेटंर,काळे पेंटर,मुन्ना कारागीर,महेश जगदाळे,अश्विनी,दामीनी,सागर कुभांर इत्यादी मुर्ती घडवण्यात मेहनत घेत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 − 1 =

error: Content is protected !!
Exit mobile version