👉सुधीर वाडेकर सह तिघांनवर गुन्हा दाखल
किवळे-देहुरोड,दि.१८ ऑगस्ट २०२३ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- किवळे गाव या ठिकाणी जागेची फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. एकच जागा अनेकांना विकल्याचा प्रकार जागा मालकाने उघड केला आहे किवळे येथील गट नंबर ३४ हिस्सा नंबर २अ/२ किवळे, तालुका- हवेली, जिल्हा-पुणे या ठिकाणी उल्हास शंकर शिंदे (वय ४२)यांनी फिर्याद दिल्यानुसार सदरची जागा समृद्धी होम्स भागीदार संस्था तर्फे १२ लाख ५० हजार रुपये किमंतीस विकत घेतली व त्याचा खरेदीखत दस्त क्रमांक ६३६७/२०२१ रोजी सातबारा उताऱ्यावर नोंद करून घेतली. मात्र आरोपी १)सुधीर विष्णू वाडेकर (वय ५२ वर्ष) रा. विकास नगर देहू रोड पुणे, २)स्वप्निल रामदास भेगडे (वय 32 वर्ष) रा. विकास नगर देहुरोड,३)हेमंत सुभाष राऊत (वय ३८ वर्ष) रा.यमुना नगर निगडी पुणे, ४) हनीफ चकोली (वय ४० वर्ष)रा.जामा मज्जिद जवळ गांधीनगर यांनी सदरची जागा परस्पर आरोपीन मध्ये आरोपी चकोली याना सदरची जागा शिंदे च्या नावावर आहे. हे माहीत असताना देखील,चकोली यांनी ती जागा घेतली व आपसापसामध्ये संगणमत करून फिर्यादी शिंदे यांची फसवणूक केली. व लबाडीच्या दृष्टीने ही जागा मिळवण्याचा प्रकार केल्याचे दिसत असल्याने देहूरोड पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादी यांच्या सांगण्यावरून देहूरोड गु.रजि.४५९/२०२३ भा.द.वी कलम ४०६ ४२० नुसार आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक नसून देहूरोड पोलीस आरोपींच्या शोधावर असून पुढील तपास करीत आहे.