Home ताज्या बातम्या न्यू सिटी प्राईड इंग्लिश स्कूलमधे स्वातंत्र दिन उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडला

न्यू सिटी प्राईड इंग्लिश स्कूलमधे स्वातंत्र दिन उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडला

0

रहाटणी,15 ऑगस्ट २०२३ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- रहाटणी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडिअम स्कूल येथे 15 ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला. मा. नगरसेविका निर्मलाताई कुटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या निमित्ताने विविध संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार, रघुनाथ भालेराव (लेखक), नंदिनी चौधरी,संकेत कुटे, बाळासाहेब शेंडगे, रोहन भालेराव, अमोल घोलप (सामाजिक कार्यकर्ते) जितेश जगताप (सामाजिक कार्यकर्ते) तसेच ईश्वरदास पौड, घेवाराम देवाशी, शाळेच्या मुख्याध्यापिका नाजनीन शेख व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने दहावी व शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कालवश श्री विद्याधर लक्ष्मण चाबुकस्वार यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच त्यांचे नावे दरवर्षी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर करण्यात आले. इयत्ता चौथी, नववी, सातवी, तिसरी, पाचवी,सहावी, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमांची शोभा वाढवली. सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले.“15 ऑगस्ट 1947 ला भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले परंतु देशात माणसाला, माणसाप्रमाणे,माणूसपण मिळवून देऊन सर्वसामान्यांना स्वातंत्र्यपणे वागण्याचा, बोलण्याचा व लिहीण्याचा हक्क मिळवून देणारे तसेच प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी उपलब्ध करून देणारे डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे” असं मत नंदिनी चौधरी यांनी व्यक्त केले.

तसेच इयत्ता आठवीच्या मुलींनी “वंदे मातरम” म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या विविध कार्यक्रमांनी सजलेल्या 15 ऑगस्ट दिनाचे विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात ‘आले.सूत्रसंचालन रेणू राठी मॅडम व श्वेता भालेराव यांनी केले.तसेच पाहुण्यांचे आभार कविता वाटेगावकर मॅडम यांनी केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 20 =

error: Content is protected !!
Exit mobile version