Home ताज्या बातम्या भाजपा-पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड, नेतृत्व, जबाबदारी, पक्षनिष्ठा आणि...

भाजपा-पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड, नेतृत्व, जबाबदारी, पक्षनिष्ठा आणि शहरातील अचूक बांधणी

0

चिंचवड,दि.१८ जुलै २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी शंकर पांडुरंग जगताप यांची निवड करण्यात आली. शंकर जगताप यांनी भाजपचे निवडणुक प्रमुख म्हणुन चिंचवड विधानसभाचे कामकाज पाहिले आहे.त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात भाजपा ची सत्ता कायम ठेवायची असेल तर जगपात फॅक्टर शिवाय पर्याय नाही.त्यामुळे आगामी येणार्‍या महापालिका निवडणुका लक्षात घेऊन त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शहराची जबाबदारी नेतृत्वाची धुरा शंकर जगताप यांच्याकडे सोपवल्याचे दिसत आहे.


मोदी सरकारला जेमतेम नऊ वर्षे पूर्ण झाल्यामुळे मोदी @९ कार्यक्रम राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमामुळे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या रखडल्या होत्या.भारतीय जनतापार्टीच्या महा. प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाल्यानंतर पक्षातील सर्वच पदांवर नव्याने फेरनिवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर नुकत्याच शहराध्यक्ष, जिल्हाअध्यक्षांच्या नियुक्या करण्यात आल्या आहेत.बावनकुळेंनी राज्यातील शहराध्यक्ष, जिल्ह्याध्यक्षांची यादी जाहीर केली आहे.त्यात शंकर जगताप यांचे शहरध्यक्ष म्हणुन नाव असल्याने चिंचवड विधान सभेत आनंदाचे वातावरण पाहिला मिळत आहे.

शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपल्या नेतृत्वाची कामाची झलक पक्ष श्रेष्ठीना दाखवली होती.पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले भाजपाचा गड शहरात शाबुत ठेवु शकतो हे स्पष्ट पणे दाखवल्याने त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीला अच्छे दिन आले आहेत. चिंचवड मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे शहरातील भाजपचे पहिले आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीने शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. व दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आणून दाखवली. त्यांनी स्पष्ट बहुमतासह महापालिकेत भाजपचे कमळ फुलवले होते.त्यामुळे जगताप फॅक्टर हा शहरात चालतो हे पक्ष श्रेष्ठीना लक्षात आले.माञ लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याने शहराचे नेतृत्व आमदार महेश लांडगे ना दिले गेले होते.माञ तरीही शहरात जगतापाचां दरारा आणि क्रेझ संपली नाही.चिंचवड विधासभा पोटनिवडणुकीत शंकर जगताप यांना तिकीट मिळु नये म्हणुन भाजपा च्या शहरातील अंतर्गत ठिम ने प्रयन्त केले. व त्या गटाला यश ही आले.त्यात भाजपा मधील अंतर्गत गटबाजी दिसुन आली.माञ शंकर जगताप यांनी त्याकडे दुर्लक्ष करत अखंड त्यांची जनसेवा कोणताही खंड न पाडता चालु ठेवला.आणि आज पक्षाने शहराची जबाबदारी त्या कडे सोपवली.

शहराध्यक्ष, जिल्ह्याध्यक्षांची नियुक्ती करताना भाजपने काही निकष निश्चित केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने खासदार, आमदार पदावर असलेल्यांना, तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या इच्छुकांना आणि विद्यमान अध्यक्ष यापैकी कोणाचीही निवड न करण्याचे निश्चित करण्यात आले होते.त्यामुळे पक्षात दबा धरुन बसलेले आधीच या रिंगणातुन बाहेरचा रस्ता दाखवला होता.तरी सुद्धा भोसरी तुन कार्तिक लांडगे आमदार महेश लांडगे यांचे बंधु यांची दबक्या अवाजात चर्चा होती.शहरध्यक्ष पद कोठे जाईल भोसरी कि चिंचवड का अचानक पिंपरी अशी चर्चा शहरभर पसरली होती.माञ चिंचवड विधान सभेच तरबेज शहरातील किंगमेकर नवे चाणक्य शंकरशेठ जगताप या कडे ती जबाबदारी आली.शहराची सुञे आता चिंचवड विधानसभेतुनच हलणार…

अध्यक्षपदासाठी कोण सक्षम आहे, याची चाचपणी मे महिन्यात प्रभारींकडून करण्यात आली होती. शहरातील विधानसभा अध्यक्ष, विविध आघाड्यांचे प्रमुखांबरोबर त्यादृष्टीने चर्चा करण्यात आली. त्यानुसार नावे निश्चित केली होती. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराध्यक्षाची निवड केली असल्याचे भाजपच्या सुत्रांनी सांगितले.माञ आता पक्षात शंकर जगताप यांच्या उमेदवारी वरुन नाराजीचा सुर काढणारे,आता तो सुर तसाच ठेवतील का? की शंकर जगताप यांच शहरातील नेतृत्व प्रामाणिक पणे स्विकारतील का ? पक्ष निष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे जरी शहरध्यक्ष शंकर जगताप झाले असले तरी पक्षांतर्गत गटबाजी वर डोके काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा हळुहळु जोर धरत आहे.त्यामुळे पुन्हा कमळ पुन्हा जगताप हि कसोटी येणार्‍या निवडणुकांन मध्ये कशी असेल या कडे शहराती विविध पक्षातील नेत्यांमध्ये आणि नागरीकांन मध्ये चर्चेचा विषय होत असुन संपुर्ण शहराचे लक्ष वेधुन घेत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + 4 =

error: Content is protected !!
Exit mobile version