Home ताज्या बातम्या विकास नगर मध्ये कोयता गॅंगची दहशत, किराणा दुकानदारावर हल्ला चढवत केली चोरी...

विकास नगर मध्ये कोयता गॅंगची दहशत, किराणा दुकानदारावर हल्ला चढवत केली चोरी त्यात दुकानदार जखमी

0

विकासनगर-किवळे,दि.११ जुन २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहुगाव येथून संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्तान सोहळा आज होत असताना दुसरी कडे गुन्हेगारांची कोयता गॅंगची विकास नगर मध्ये दहशत कोयत्याचा धाक दाखवत किराणा दुकानात चोरी,कोयता उगरत दुकानदाराला लुटले किराणा दुकानदारावर वार केले त्यामुळे संपूर्ण विकास नगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विकास नगर किवळे येथील मुनमजी बंगल्यासमोरील चौधरी सुपर मार्केट या किराणा दुकानदारावर सायंकाळी सातच्या सुमारास तिघेजण कोयता घेऊन घुसले दुकानावर इकडे तिकडे कोयता फिरवत दुकान मालकाच्या अंगावर कोयता उगरत गल्यातील रोकड गायब केली, तिघे जणांमधील कोयता गॅंग चे दोघेजण पळून जाण्यास यशस्वी तर त्यातील एक आरोपी किराणा दुकानदार व त्यांच्या भावाने पकडून ठेवण्यास यशस्वी झाले किराणा दुकानदार दोघांनी धाडस दाखवत एकाला पकडले. मात्र दुकानावर दुकानातील दोघें मालकावर कोयता फिरवल्याने दुकानाचे नुकसान झाले.व दोघेजण मालक जखमी झाले आहेत त्यांच्यावर देहूरोड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास देहुरोड पोलिस स्टेशनचे पोलिस करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × one =

error: Content is protected !!
Exit mobile version