देहुरोड,दि.०१ जुन २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-हिंदू मुस्लिम तसेच सर्व धर्मीयांमध्ये जातीय सलोखा अबाधित रहावा व समाजात प्रेम व एकोपा प्रस्थापित व्हावा असा शांतीचा संदेश देणारे हजरत सुफी सलामती पीर (रे .अ )यांच्या देहूरोड येथील दर्ग्यावर कळस चढविण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात ३० मे रोजी साजरा झाला.
मागील अकरा वर्षापासून सलामती पीर यांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात . पीर साहेबांना मानणारा वर्ग देशभरात असून राज्यात त्यांच्या अनुयायांची संख्या लाखोच्या घरात पोहोचलेली आहे . तब्बल अकरा वर्षानंतर पीर साहेबांच्या दर्ग्यावर कळस चढवणार असल्याची माहिती दर्गा ट्रस्टच्या प्रमुखांनी त्यांच्या अनुयायांना देताच अनुयायांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे त्यांची पावले आपसूक पीर साहेबांच्या दर्ग्याकडे वळाली सायंकाळच्या अल्हाददायक वातावरणात हजारो अनुयायांच्या उपस्थितीत तसेच भारतातून आलेल्या इतर प्रमुख दर्ग्यांच्या विश्वस्थांसोबत पीर साहेबां च्या तसेच अल्लाह च्या नामाचा जयघोष करत पिर साहेबांच्या दर्ग्यावर कळस चढविण्यात आला . हा नयनदीप्य क्षण अनुभवतांना अनुयायांच्या डोळ्यांचे पारणे फिटले संपूर्ण ईंदगाह मैदान अनुयायांनी फुलून गेले होते यावेळेस विश्वशांतीसाठी मान्यवरांकडून अल्लाकडे इस्तेमाई दुवा करण्यात आली कार्यक्रमाच्या सांगता सुफी कॉन्फरन्स तसेच ईद मिलनाच्या कार्यक्रमाने झाली यावेळेस हिंदू मुस्लिम सिख बौद्ध भिकू यांनी एकमेकांना गळाभेट करून शुभेच्छा देत शीरखुर्माचे सेवन केले.मागील अकरा वर्षापासून सलामती पीर दर्गा ट्रस्टच्या वतीने राज्यात विविध सामाजिक धार्मिक , शैक्षणिक उपक्रम राबविले जात असल्यामुळे हा कार्यक्रम याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दर्गा ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त हाजी अराफत शेख यांनी मान्यवरांचे मोठ्या आदराने स्वागत केले पीर साहेबांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन केलेले कार्य , समाजाला दिलेला प्रेम व शांतीचा संदेश ट्रस्टच्या माध्यमातून असाच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा काम सुरू ठेवणार असल्याची ग्वाही यावेळी शेख यांनी दिली.या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मा. केंद्रीय मंत्री शहानवाज हुसैन खासदार श्रीरंग बारणे मा. खासदार अमर साबळे मा .आमदार मंगेश सांगळे तसेच अजमेर शरीफ दर्ग्याचे विश्वस्त अनसचिस्ती, बिजापूर येथील सरकार पीर आदिल यांचे वंशज कदीर उल्लाह शाह कादरी लासानी पीर,राज्यभरात ज्यांचे लाखो अनुयायी आहेत असे खोपोली येथील वरिष्ठ धर्म गुरु फैमीपीर साहेब यांच्यासोबतच संत तुकाराम महाराजांचे वंशज विश्वस्त संजय महाराज मोरे अजित महाराज मोरे,बौद्ध भिक्षुक , देहुरोड गुरू द्वारा चे प्रमुख गुरमीत सिगं रत्तू यांच्या सोबतच सिने अभिनेता रजा मुराद ,शहजाद खान शहबाझ खान प्रसिद्ध उद्योगपती अली मर्चंट अझम शेख वरीष्ठ वकील रिझवान मर्चंट, आसिफ कुरेशी यासोबतच देशभरातील अनेक धर्मगुरु (औलामा ,आलीम) उपस्थित होते.संबंधित कार्यक्रमादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ईदगाह मैदानात लावण्यात आलेला होता .