पिंपरी,दि.२९ मे २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगर पालिका दरवर्षी मोठ्या प्रमाणात क्रांतीसुर्य मा.फुले आणि भारतरन्त डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जंयती मोठ्या उत्साहात साजरी करते व विचारप्रबोधन पर्व राबवते,माञ अलिकडील काळात गेले तीन वर्षा पासुन कार्यक्रम झाल्यास आरोप होत आहेत.माञ कोणी तक्रार करायला पुढे येत नाही किंवा आवाज उचलण्यास तयार नाही.कारण कोणी अवाज उचलला कि त्या विरोधात कार्यकर्त्यानां भडकवायचे आणि त्यात दुफळी निर्माण करायची आणि स्वचर्चा घडवुन आणियाची यावर कोणाची नजर पडो वा न पडो माञ आंबेडकर चळवळ म्हटली की अंतर्गत चुकीची गोष्ट हि खुली करुन सांगितली जाते.अशीच ढिसाळ पणाची घटना या वर्षी पिंपरी चिंचवड मनपा च्या वतीने होणार्या क्रांतीसुर्य मा.फुले,व भारतरन्त डाॅ.बाबासाहेब आंबेडर विचार प्रबोधन पर्वात घडली आहे.त्या विरोधात समता समाज संघ पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष निलध्वज माने व अॅड.मिलींद कांबळे यांनी दंड थोपटले असुन आयुक्त शेखर सिंह यांना पञा द्वारे निवेदन दिले आहे.व ढिसाळ व भोंगळ कारभार करणार्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई न केल्यास पालिका भवना समोर अक्राश बोंबा बोंब मोर्चाचा इशारा देखील दिला आहे.पञात नावाचा उल्लेख जरी टाळला असला तरी हा रोख आधिचे जनसंपर्क अधिकारी म्हणजेच आताचे विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्या कडे जातो.किरण गायकवाड यांच्या कडे यंदा जयंतीचा कारभार नव्हता त्यांनी स्वता मागुन घेतला अशीही चर्चा कार्यकर्त्यान मध्ये आहे.ढिसाळ नियोजनामुळे आंबेडकरी जनते मध्ये संतापाची लाट आहे.पञा मध्ये त्याची काही कारणांचा देखील उल्लेख आहे पुढील प्रमाणे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे सन २०२३ च्या महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सादर केलेल्या विचार प्रबोधन कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजना बाबत खुलासा करण्याबाबत पञात म्हटले आहे.
या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंचे औचित्य साधून विचार प्रबोधन सादर करण्यात आले परंतु या वर्षी दिसाळ नियोजना मुळे आंबेडकरी जाणते मध्ये संतापाची लाट आहे, ते खालील कारणामुळे
१. प्रबोधनाच्या कार्यक्रमात महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव आणि नागराज मंजुळे यांनी पाठ फिरवली त्यामुळे हा कार्यक्रम सादर नाही झाला.
२. रुपयांचा प्रश्न या ग्रंथाला १० वर्षे पूर्ण झाले होते याचे औचित्य साधून डॉ. नरेंद्र जाधव यांची प्रबोधनासाठी तारीख मिळाली असताना त्याविषयाशी निघडीत नसणान्या वक्त्यांना बोलावण्यात आले त्यापैकी काही वक्ते गैर हजर होते.
३. संबंधित अधिकारी महानगरपालिका व प्रशासनाच्या विरोधात माथी भडकावून कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल अश्यापद्धतीचे वर्तन करून अधिकारी पदाला अशोभनीय वर्तन करतो त्यामुळे या अधीकार्यान कडुन जयंती महोत्सवाचे नियोजन काढून घेण्यात यावे.
४. काही विध्यार्थी स्पर्धा परीक्षा पास नसताना त्यांचा सत्कार करण्यात आला याबाबत खुलासा करावा.
तरी याबाबत संबंधित अधिकार्यानवर व कर्मचार्यानवर योग्य ती कार्यवाही करावी. याबाबत अहवाल देण्यात यावा अन्यथा महापालिका भवनासमोर आक्रोश व बोंबा-बोंब मोर्चा करण्यात येईल. असा थेट आयुक्तांना इशारा देण्यात आला आहे.माञ किरण गायकवाड व त्यांच्या सबोत असणारे अधिकारी कर्मचारी व त्यांवर जबाबदारी ठाकणारे अधिकारी यांच्यावर पालिका आयुक्त कारवाई करतील का?कारवाई न केल्यास जर अक्रोश बोंबा-बोंब मोर्चा निघाल्यास आंबेडकरी जनतेच्या भावना तिव्र होतील व उद्रेक निर्माण होईल.त्या मुळे आयुक्त साहेब कारवाई करतील कि नाही अशा उलटसुलट चर्चा होत आहे.व या ढिसाळ कारभारा विरोधात अनेक संघटना पक्ष एकञित येत आहेत.त्यामुळे काही विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.