तळेगाव दाभाडे,दि.१४ मे २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची कट रचुन हत्या माजी उपनगरध्यक्ष/ नगरसेवक भानू उर्फ चंद्रभान खळदे यांच्या मुलाने कट रचुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हत्येचा गौरव खळदे हाच मुख्य सुत्रधार असल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे.गौरव चंद्रभान उर्फ भानू खळदे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी खळदे याला पोलिसांनी शनिवारी (ता. १३) रात्री उशिरा अटक केली.या हत्येचा तो मुख्य सुत्रधार असल्याचे समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात चंद्रभान उर्फ भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचाच राग मनात ठेवून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं मनात ठाणले होते. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच मारण्याचे ठरवत किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची पोलीसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनी गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांकडून देण्यात आली आहे.जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा तळेगाव नगरपरिषदेसमोर आरोपीनी रघु धोञे,आदेश धोञे,शाम निगडकर,संदीप मोरे यांनी कोयत्याचे २१ वार आणि ३ गोळ्या घालत निर्घृण हत्या केली. यात आवारे यांचा जागीच मृत्यू झाला.याचा व्हिडीओ वार्यासारखा वायरल झाला.तळेगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आवारे यांच्या कुटुंबियांकडून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह त्यांच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात सुनील शेळके यांनी काल पञकार परिषद घेत माध्यमांसमोर आपली बाजू मांडली होती. आपला या हत्येशी काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा व घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील आता पाचव्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी एकाला पुणे पोलिसांनी तर तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली. तर पाचव्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट पाचने देहूरोड येथून ताब्यात घेतले.रघु धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर यांना खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली. संदीप मोरे पुणे पोलिसांनी अटक केली. सिनु उर्फ श्रीनिवास व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) याला गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे अवघ्या काही तासांत पोलिसांनी दक्षता घेत हत्येतील आरोपीना व मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यश मिळवले आहे. या घटनेतील आरोपींनी पोलिसांकडे कबुली दिल्याने मुख्य सूत्रधार सापडला आहे. गौरव चंद्रभान उर्फ भानु खळदे हा या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आलं आहे.आणखी तपासात काही निष्पण होते का ? यासाठी अधिक तपास पोलिस करत आहेत.