Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड शहरातून लोकनियुक्त प्रथम महिला आमदार होण्याची दाट शक्यता

पिंपरी चिंचवड शहरातून लोकनियुक्त प्रथम महिला आमदार होण्याची दाट शक्यता

0

चिंचवड,दि.२५ फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्वरितच काही दिवसांनी ह्या पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली संपूर्ण परिसर आमदारकीच्या निवडणुकीच्या बातमीने चर्चेचा बनला त्यामध्ये भाजपाकडून शंकर शेठ जगताप यांचे नाव चर्चेत होते मात्र दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई जगताप यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी घोषित केली तर महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांच्या नावाची चर्चा घडवण्यात आली मात्र राहुल कलाटे यांना अपक्ष निवडणूक रिंगणात उतरावे लागले तर महाविकास आघाडी कडून नाना काटे यांना उमेदवारी दिली.पण एकंदरीत दोन्हीकडूनही ह्या पिंपरी चिंचवड शहराला एका महिलेला टक्कर देण्यासाठी एकही विरोधात प्रस्थापित वर्गाकडे महिला उमेदवार दिसल्या नाही,किंवा अत्ता नव्हत्या असे म्हणण्यास काही हरकत नाही. परंतु प्रस्थापित पक्षाने आज तागायत पिंपरी चिंचवड शहरात महिला उमेदवार लोकमातातून निवडून आणू शकले नाही. त्यामुळे एकंदरीत संपूर्ण चिंचवड विधानसभेत नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात एकच चर्चा उडाली, काल प्रचाराची धामधूम संपल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा शहराला प्रथम महिला आमदार मिळणार ते पण लोकमतातून त्यामुळे महिलांना पहिल्यांदा पिंपरी चिंचवड शहरात स्वतःचा हक्काचा नेतृत्व मिळणार, शहरातील संपूर्ण महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. महिलांचे गाराने, महिलांचे प्रश्न अनेक समस्या ज्या एका महिलेशी शेअर करता येतात त्या अनुषंगाने महिला उमेदवाराकडे महिलांकडून पाहिले जात आहे. अर्थातच उद्या मतदान त्या बंद पेठीत त्या बंद खोलीत नक्की कुणाला मतदान होणार हे मतदारच ठरवणार पण मात्र शहराला प्रथम लोकनियुक्त महिला आमदार मिळणार हि चर्चा वाऱ्यासारखी पसरत आहे. महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादीचे उमेदवारांसाठी अनेक दिग्गज प्रचारासाठी मैदानात होते जवळजवळ अजितदादा पवार तर संपूर्ण चिंचवड विधानसभेवर लक्ष केंद्रित करुन होते त्यामुळे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची चांगली गोची झाली.मात्र राहुल कलाटेनीही वंचित बहुजन आघाडीचे सर्वा सर्वे बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा घेत सर्वांना प्रश्नांकित करून सोडले. आणि सर्व उमेदवारांच्या प्रचार सभासद रॅली असेल कोपरा सभा असेल अशा अनेक दिग्गज आणि प्रस्थापित नेत्यांना तोडीस तोड देण्याचा प्रयत्न केला अर्थातच सगळीकडे तीन उमेदवारांची चर्चा आहे मात्र ही लढत तिरंगी नसून वन साईड होण्याची शक्यता दाट वाढली आहे.कारण संपूर्ण महिलांमध्ये पहिल्यांदा महिलांना नेतृत्व मिळणार त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे प्रत्येक घरातली गृहिणी महिलावर्ग यांच्यामध्ये महिला उमेदवार कडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक पुढे नेणार आहे. त्यामुळे एका महिलेला पिंपरी चिंचवड शहरातून लोकनियुक्त पहिली महिला आमदार होण्याचा मान मिळेल का ? की ह्या महिलेला हरवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार किंवा बंडखोर अपक्ष उमेदवार यांना निवडून आणले जाईल हे येणारी जनता उद्या आपल्या मतदानातून दाखवून देईल. ह्या निवडणुकीच्या धामधुमीत अनेक चर्चा वाऱ्यासारखे पसरल्या अनेक ठिकाणी ह्या निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. अनेक ठिकाणी ज्यांना राजकारण कळत नाही त्यांनी आपापल्या अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी ज्यांना इतिहास माहिती आहे,त्यांनी पण त्या इतिहासाला रंगून रंगून सांगण्याचा प्रयत्नही केला. निवडणूक विभागाचं ह्या संपूर्ण गोष्टीवर बारकाईने लक्ष केंद्रित होते, या सर्व गोष्टीकडे निवडणूक आयोगाने थेट आणि अचूक लक्ष बजावल्यामुळे संपूर्ण यंत्रणा शांतता मय पार पडत गेली. अनेक मतदान केंद्र उद्याच्या मतदानासाठी तयारीत आहेत कोण कोणाला मतदान करेल हे तर मतदान करणाऱ्या मतदाराला माहीत पण अनेक वावड्या उठवण्यासाठी अनेक गोष्टीचा प्रयत्नही केला जाऊ शकतो. त्यामुळे पोलीस यंत्रणा ही सज्ज आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रकार घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.लागलीच कोणती शंका पुटपुटली तर निवडणूक विभाग असेल किंवा जवळील पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा.प्रजेचा विकास या सर्व गोष्टीकड व संपुर्ण राजकीय हालचाली घडामोडीन वर बारकाईने लक्ष ठेवुन आहे.उद्या २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदान चालू राहील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी मतदान करण्याचा आपला हक्क बजावावा.ह्या लोकशाहीला बळकट करून आपले कर्तव्य बजावावे.निकाल ०२ मार्च २०२३ ला पाहुया कोणाच भवितव्य काय असेल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 − 2 =

error: Content is protected !!
Exit mobile version