Home ताज्या बातम्या मोठी बातमी:: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शहराध्यक्ष अ‍ॅड.सचिन भोसले यांच्यावर भ्याड...

मोठी बातमी:: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शहराध्यक्ष अ‍ॅड.सचिन भोसले यांच्यावर भ्याड हल्ला

0

चिंचवड-वाकड,दि.२२ फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- अ‍ॅड. सचिन भोसले शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष यांच्यावरती भ्याड आला करण्यात आला आहे या हल्ल्यात ते जखमी झाले असून ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार साठी दाखल करण्यात आले आहे.

हा भ्याड हल्ला थेरगाव मंगल नगर येथील घराजवळील रॉयल बेकरीच्या समोर झाला असून अ‍ॅड.सचिन भोसले महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ थेरगाव मंगल नगर परिसरात निघाले होते. समोरून अचानक अज्ञात हमले खोरांनी हल्ला केला भोसले यांना रोडवर पाडुन ब्लॉक गट्टू ने मारहाण केली. त्यांचे कपडे फाडून त्यांना खाली पडून मारहाण केले हा सर्व प्रकार घडत असताना तिथे गर्दी जमली होती. तेथे उभे असलेले काही पोलीस कर्मचाऱ्यांनी गर्दी पाहुन गर्दीची पांगवा पांगव केली,भोसले यांना तात्काळ हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन जाण्यात आले वाकड पोलीस भोसले यांच्याशी संपर्कात असून अज्ञात अरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम करीत आहेत. प्राथमिक माहितीनुसार आज्ञात हमलेखोरांमध्ये काही लोक भोसले यांच्या ओळखीचे असून त्यांनी यापूर्वी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संपूर्ण एकंदरीत हा प्रकार चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीला डाग लावण्यासारखा आहे अशी चर्चा संपूर्ण वाकड परिसरात पसरली असून याचे काही पडसाद चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूक वर पडतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 1 =

error: Content is protected !!
Exit mobile version