Home ताज्या बातम्या चिंचवड पोटनिवडणुक-सिद्दीक शेख यांचा नोटराइज्ड जाहिरनामा सादर तर भल्याभल्यांच्या बत्या गुल

चिंचवड पोटनिवडणुक-सिद्दीक शेख यांचा नोटराइज्ड जाहिरनामा सादर तर भल्याभल्यांच्या बत्या गुल

0

चिंचवड,दि.२० फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- २०५ , चिचंवड विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख निवडणूक लढवीत आहेत. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करून जनतेचे लक्ष मुद्यांपासून विचलित करीत असल्याने जनतेच्या मुद्यांवर जाब विचारण्यासाठी आणि राज्यातील घाणेरडे राजकारण लोकांसमोर मांडण्यासाठी निवडणूक हे चांगले माध्यम होते. आणि त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेला तळागाळातील जनतेशी नाळ असलेला सामान्य माणूस निवडणूक का लढवतोय.

शेख यांनी आता पर्यंत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रबोधन , जनजागृती ,आंदोलनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न सोडवले आहेत. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम शेख साततत्याने करीत असतात अनेक मर्यादा येत असल्याने राजकीय भूमिका घेऊन २०५ चिचंवड विधानसभा निवडणूक लढवत आहेत. राजकीय पक्षांचे नेते निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने देतात .परंतु सिद्दीक शेख यांनी या गोष्टींना फाटा देत जनतेसाठी जाहीरनामा स्टॅम्प पेपर वर लिहून नोटराइज्ड करून जनतेसमोर सादर केला आहे. यामध्ये त्यांनी मतदार संघातील १२ मुद्दे मांडलेले आहेत .
” सिद्धिकी शेख यांचा जाहीरनामा ”
१) पिंपरी चिचंवड शहरातील अनाधिकृत बांधकाम बाधितांचा प्रश्न व शास्तीकराचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करणार .
२) शासकीय व खासगी दवाखान्यातून सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी विधानसभेत ” रुग्ण हक्क कायदा ” मांडणार .
३) खासगी शाळांमधून पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवून , सरकारी शाळांची गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार .
४ पिंपरी चिंचवड शहरातील पवना,इंद्रायणी ,मुळा नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविणबर
५) चिचंवड मतदार संघातील वाकड , हिंजवडी ,पिंपळे सौदागर ,काळेवाडी ,डांगेचौक यांसारख्या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करून मोठी वाहने , बसेस पार्किंग साठी आरक्षित जागेमध्ये बहुमजली वाहनतळ उभे करून वाहतूक प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार .
६) चिचंवड विधानसभा मतदार संघातील दत्तनगर , सिद्धार्तनगर ,अशोकनगर , एम. बी .कॅम्प , काळाखडक , म्हातोबा नगर , अण्णाभाऊ साठेनगर इत्यादी झोपडपट्यांमधील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊन झोपडपट्टी धारकांचे मूलभूत प्रश्न सोडवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणार
७) पिंपरी चिचंवड शहरातील गृहनिर्माण सोसायटीमधील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रकल्पासाठी जागा व अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करून कचरा प्रश्न सोडणार आहे.
८) चिचंवड मतदार संघामध्ये मराठवाड्यातील बीड ,नांदेड , उस्मानाबाद , लातूर , जालना , औरंगाबाद , परभणी , इत्यादी ठिकाणाहून कामासाठी आलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर इथेच स्थायिक झालेले आहेत . मराठवाड्यातील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी ” मराठवाडा भवन ” उभे करणार .
९) चिचंवड मतदार संघातील मुस्लिम बांधवाना २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला कब्रस्तानचा प्रश्न मार्गी लावणार
१०) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सोबत शैक्षणिक कार्य करणाऱ्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख व मानवतावादी समाजसेविका मदार तेरेसा यांचे स्मारक उभे करणार
११) मुस्लिम , ख्रिश्चन ,बौद्ध ,जैन यांसारख्या अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळांवर वारंवार होणारे हल्ले व अल्पसंख्यांकावर होणारे अन्याय अत्याचार विरोधात अल्पसंख्यांक अत्याचार विरोधी प्रतिबंधक कायदा विधानसभेत मांडणार
१२) सर्व समाजातील थोर महापुरुषांची होणारी बदनामी रोखण्यासाठी सभागृहात ” महापुरुष बदनामी प्रतिबंधात्मक कायदा ” करण्यासाठी प्रयत्न करणार
ह्या मुद्द्यांवर अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख यांनी आपले मत मांडले .
जर वरील आश्वासने पूर्ण करू शकलो नाही तर माझ्यावर भारतीय दंड संहिता १९६० कलम १९९ व २०० व अन्य संबंधित कायदयानुसार माझ्यावर खटला भरण्याचा अधिकार जनतेला असेल. अशाप्रकारे नोटराइज्ड करून जाहीरनामा जनतेला जाहीर केला आहे.
पत्रकार परिषदेत अपना वतन संघटनेचे सचिव दिलीप गायकवाड , कार्याध्यक्ष राजू शेरे , महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , संघटक प्रकाश पठारे , तौफिक पठाण , जितेंद्र जुनेजा , हाजीमलंग शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 − four =

error: Content is protected !!
Exit mobile version