चिंचवड,दि.१८ फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राहुल कलाटे हे चिंचवड विधान सभेतील पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार आहेत.त्यानी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापञात सरकारी कामात अडथळा आणल्याचे म्हटले आहे.माञ तो गुन्हा जनतेच्या मतदारांच्या कामासाठी नसुन वैयक्तीक टिडीआर मिळवण्यासाठी घडलेल्या वादातील २०१९ चा गुन्हा आहे.माञ पदाचा फायदा घेत सरकारी अधिकार्यांना दमबाजी करण उद्धट बोलणे,आमदार झाल्यावर मग अधिकार्यांना सुट्टीच नाही.त्यामुळे चिंचवड विधान सभेतील सुज्ञ मतदार यावर विचार करतील,यांचा फटका राहुल कलाटे ना आताच्या पोटनिवडणुकीत बसेल का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमके काय घडले होते प्रकरण-
महापालिकेतील राहूल कलाटे यांच्या टिडीआर फाईलवर सही का केली नाही म्हणून त्यांनी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम निर्मंलन विभागाचे उपअभियंता (स्थापत्य) अनिल महादेव राऊत (वय ५२, रा. चिंचवड) यांना ११ फेब्रुवारी रोजी शिवीगाळ करत मारहाण केली होती
महापालिका अधिकारी अनिल राऊत यांनी अरोप केला ११ फेब्रुवारीला हा प्रकार घडला, मात्र कलाटेंवर १३ फेब्रुवारीला २०१९ रोजी,पिंपरी पो.स्टे गुन्हा रजि.२६९/२०१९ भा.द.वि कलम ३५३,३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप पालिका अधिकारी अनिल राऊत यांनी केला आहे. अभियंता सतीश इंगळे यांच्या कार्यालयात हा प्रकार झाला होता असा आरोप आहे, टीडीआर प्रकरणावरुन राहुल कलाटे आणि अनिल राऊत यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती आहे. कलाटेंनी आधी फोनवरुन शिवीगाळ केली. त्यानंतर कलाटे आणि विनोद मोरे इंगळे यांच्या कार्यालयात आले. त्यावेळी राऊत तिथेच बसलेले असताना त्यांच्या अंगावर खुर्ची फेकून मारली आणि त्यांची गचंडी धरत दमबाजी केली, असा आरोप कलाटेंवर आहे.याप्रकरणात राहुल कलाटे यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
माञ पदाचा फायदा घेत सरकारी अधिकार्यांना दमबाजी करण उद्धट बोलणे,आमदार झाल्यावर मग अधिकार्यांना सुट्टीच नाही.त्यामुळे चिंचवड विधान सभेतील सुज्ञ मतदार यावर विचार करतील,यांचा फटका राहुल कलाटे ना आताच्या पोटनिवडणुकीत बसेल का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.