Home ताज्या बातम्या चिंचवड विधानसभेत कमळ फुलणारची चर्चा; शिट्टीचा जोर मात्र कायम तर घडयाळाचा प्रचारात...

चिंचवड विधानसभेत कमळ फुलणारची चर्चा; शिट्टीचा जोर मात्र कायम तर घडयाळाचा प्रचारात फक्त् कार्यकर्त्याची धामधुम

0

चिंचवड,दि.१६ फेब्रुवारी २०२३ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- चिंचवड विधानसभेत कमळ फुलणारची चर्चा; शिट्टीचा जोर मात्र कायम तर घडयाळाचा प्रचारात फक्त् कार्यकर्त्याची धामधुम भाजपा च्या अश्विनी जगताप यांचे चिन्ह कमळ असुन प्रचारात आघाडीवर तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे चिन्ह शिट्टीअसुन अजुन प्रचाराची जमावजमव मध्ये व्यस्त,तर महाविकास अघाडीचे घड्याळ चिन्ह असणारे नाना काटे हे प्रचारात भेटीगाटी मध्ये व्यस्त माञ कर्यकर्ते वगळता नागरीकांनमध्ये अजुन घड्याळाची चर्चा नाही,त्यामुळे मतदारांन मध्येही संभ्रम अजुन दिसुन येत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांची भावनेची लाट तरी कायम असल्याची चर्चा नागरीकांनमध्ये अद्याप तरी आहे.शिट्टी चा प्रचारात जोर कायम आहे माञ नागरिकांन पर्यंत राहुल कलाटे अजुन पोहचले नाहीत.

मतदारांना मतदान करण्यासाठी व त्यांचे मन वळवण्यात कोण यशस्वी ठरणार ह्या कडे सर्वाचे लक्ष लागुन आहेत.माञ रिंगणात तिन्ही उमेदवारांची चर्चा जरी असली तरी रिगंणात अजुन २५ उमेदवार आहेत,कोण अचानक पुढे येईल याची खाञी नाही,समाजसेवेचा वसा असणारे सिद्धिकी शेख सफरचंद चिन्ह घेऊन तर गोपाळ तंतरपाळे कपाट चिन्ह घेऊन निवडणुक लढवत आहेत.राजकीय चढाओढीत नागरिकांच्या मुळ प्रश्नानवर माञ कोणत्याच उमेदवाराचे लक्ष नाही,नाना काटे यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पाठींबा जरी असला तरी कार्य कर्ते माञ राहुल कलाटे न कडे वळतायत या सर्व धामधुममीत अश्विनी ताई जगताप यांची लोकप्रियता वाढत चालली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 + 20 =

error: Content is protected !!
Exit mobile version