Home ताज्या बातम्या अश्विनी जगताप यांना एक लाखांच्या मताधिक्याने निवडून देण्याची जनभावना; बाळासाहेबांच्या शिवेसेनेचाही सिंहाचा वाटा...

अश्विनी जगताप यांना एक लाखांच्या मताधिक्याने निवडून देण्याची जनभावना; बाळासाहेबांच्या शिवेसेनेचाही सिंहाचा वाटा असेल – खासदार श्रीरंग बारणे

0

चिंचवड,दि.१३ फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची शनिवारी थेरगावमध्ये बैठक झाली. त्यामध्ये खासदार बारणे यांनी अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी करण्याची जनभावना निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांना मिळणाऱ्या मताधिक्यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा सिंहाचा वाटा असावा यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रचार सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले.

चिंचवड पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव येथील दत्त मंदिरात शनिवारी बैठक झाली.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे, शहरप्रमुख निलेश तरस, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, शहर संघटक हेमचंद्र जावळे, उपशहरप्रमुख रविंद्र ब्रह्मे, जिल्हा संघटिका शैला पाचपुते, उपजिल्हासंघटिका शारदा वाघमोडे, पिंपरी विधानसभा प्रमुख शैला निकम तसेच भाजपाचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “अश्विनी लक्ष्मण जगताप या महायुतीच्या उमेदवार आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहे. त्याच्या जोरावर अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा पोटनिवडणुकीत विजय निश्चितपणे होणार आहे. मतदारसंघातील जनतेने त्यांना विजयी करून भरघोस मतांनी विधानसभेत पाठविण्याचा निर्धार पक्का केलेला आहे. त्यांना एक लाखांहून अधिक मताधिक्यांनी विजयी करण्याची जनभावनाच निर्माण झालेली आहे. या जनभावनेचा बाळासाहेबांच्या शिवसेनेने आदर करायला हवा. अश्विनी लक्ष्मण जगताप यांना मिळणाऱ्या मताधिक्यामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सिंहाचा वाटा राहावा यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा जोमाने प्रचार सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले.”

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 5 =

error: Content is protected !!
Exit mobile version