चिंचवड,दि.१० फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून मनधरणी झाली.शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कलाटे यांचा संपर्क करुन दिला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत कलाटे यांची सुमारे ७ मिनिटे फोनवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांचा अनादर करायचा नाही. पण, माझ्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर माघार घ्यायची की नाही. हा निर्णय घेणार असल्याचे राहुल कलाटे यांनी सांगितले. त्यामुळे नेत्यांच्या मनधरणीला यश येते की नाही अद्याप माञ माघार घेण्याबाबत कलाटे यांनी स्पष्ट केले नाही. महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तदनंतर कलाटे यांचे बंड हे महाविकास आघाडीला घातक ठरु शकते त्यामुळे माघार घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना,राहुल कलाटे हे वाकड येथील त्यांच्या कार्यालयात बसुन आहेत,त्यांना मनधरणी करण्यासाठी स्थानिक राष्र्टवादीचे नेते कलाटे यांच्या कार्यालयात येत आहेत.राहुल कलाटे यांनी माघार घेतल्यास राहुल कलाटे यांचे राजकीय भवितव्य संपुष्टात येईल.त्यामुळे राहुल कलाटे काय निर्णय घेतात या कडे सर्वाचे लक्ष लागुन आहे.