Home ताज्या बातम्या चिंचवड विधानसभेत राजकीय कुरघोड्यांना सुरवात तर कोणाच पारड जड

चिंचवड विधानसभेत राजकीय कुरघोड्यांना सुरवात तर कोणाच पारड जड

0

चिंचवड,दि.०६ फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरात दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नतंर अभ्यासु व सर्व समाजाशी बांधीलकी असणारा नेता म्हणजे राष्र्टवादीचे भाऊसाहेब भोईर,महाविकास आघाडी ने विचार पुर्वक चिंचवडची उमेदवारी भाऊसाहेब भोईर यांना दिली तर चिंचवड मतदार संघ हा राष्र्टवादी कडे खेचुन आणण्यासाठी भरघोस मदत होईल अन्यथा नाना काटे,मोरेश्वर भोंडवे,नवनाथ जगताप या पैकी कोणाला उमेदवारी दिल्यास वनसाईड भाजपाला विजय मिळेल.शिवसेनेचे राहुल कलाटे यांना ही मागील निवडणुकीत मिळालेले मतदान मिळणे शक्य नाही.कारण त्यांचा जनसंपर्क कमी झाला असुन जनतेत नाराजी आहे.भारतीय जनता पार्टीने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पन्ती अश्विनीताई जगताप यांना उमेदवारी दिली.त्यामुळे निवडुन आणण्यासाठी सर्व स्तरावर प्रयन्त केला जाईल जास्तीत जास्त विजय मिळालाच तर निसटता विजय मिळेल.माञ शंकरशेठ जगताप यांना उमेदवारी दिली असती तर वनसाईड विजय मिळवता आला असता.आणि भाजपा आणि संघ प्रणित उमेदवार असल्याने पुरोगामी महाराष्र्ट म्हणारे महाविकास आघाडी काय निर्णय घेईल याकडे सर्वाचे लक्ष आहे.माञ जगताप ना जगताप तर भोईरांना भोईर,काटे ना काटे,भोंडवे ना भोडंवे पाडण्यासाठीचे डावपेच तयार झाले आहेत अशी उडती चर्चा आहे.त्यामुळे संपुर्ण चिंचवड विधानसभेत कुरघोड्यांना सुरवात झाली असुन चिंचवड विधान सभेत चांगलीच रंगत पाहिला मिळणार आहे.माञ या सर्व गोष्टी कडे पहाता विकास कामाचे अश्वासन नको तर कामे हवीत अशी मतदारांन मध्ये भावना आहेत.दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची सल भाजपा ला सतत जाणवेल तर महाविकास आघाडी भावनेच्या राजकारणाला बदलण्यात यशस्वी होईल का या कडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × two =

error: Content is protected !!
Exit mobile version