Home ताज्या बातम्या Breaking News :: पिंपरी-चिंचवड-भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन

Breaking News :: पिंपरी-चिंचवड-भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन

0

चिंचवड,दि.०३ जानेवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहराचे किंग मेकर मानले जाणारे सर्वांच्या मनावर राज्य करणारे आमदार लक्ष्मण जगताप अखेर काळाच्या पडद्याआड संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात भाऊ म्हणून सर्वांच्या मनावरती राज्य करणारा आमदार यांचे दीर्घ आजाराने निधन झाले असून शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या प्रश्नाकडे तसेच राजकारणासोबत समाजसेवेचा सांभाळत होते.अनेक उपक्रम नव्याने राबवत नुकतेच आता महाआरोग्य शिबीराचे आयोजन करुन जनतेला आरोग्य विषयी जनजागृती केली.

गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरशी त्यांचा लढा सुरु होता.अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. पिंपरीच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
२०१४ पर्यंत अजित पवार यांचे विश्वासू आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप मनसे पाठिंब्यावर निवडणूक लढली पण पराभव झाला. त्यानंतर विधानसभेला भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून उमेदवारी मिळवत त्यांनी विजय मिळवला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी पालिकेत भाजपला विजय मिळवून दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतून लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. १९८६ साली ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर, जगताप यांनी काँग्रेसला राम राम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

लक्ष्मण जगताप हे पिंपरी चिंचवडच्या स्थायी समिती अध्यक्षपही राहिले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवडचे महापौर होते. त्यांची दोनवेळा महापौरपदी वर्णी लागली. त्यानंतर २००४ साली ते विधानपरिषदेचे सदस्य झाले. या काळात ते राष्ट्रवादीतच होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + 2 =

error: Content is protected !!
Exit mobile version