Home ताज्या बातम्या “हर दिन हर घर आयुर्वेद” निर्विकार आरोग्य दिनदर्शिकेचे प्रकाशन

“हर दिन हर घर आयुर्वेद” निर्विकार आरोग्य दिनदर्शिकेचे प्रकाशन

0

पिंपरी,दि.१६ डिसेंबर २०२२( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- धन्वंतरी जयंती निमित्त आयुष मंत्रालय घोषित “हर दिन हर घर आयुर्वेद” या संकल्पनेतून प्रेरित होऊन भोसरी येथील निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलने प्रत्येक घरोघरी आयुर्वेद पोहोचवावा या उद्देशाने “निर्विकार आरोग्य दिनदर्शिका २०२३” तयार केली आहे. प्रत्येक घरात निर्विकार आरोग्याची गुरुकिल्ली पोहचून आयुर्वेद बाबत जनजागृती होईल.


त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आरोग्याच्या दृष्टीने जागरूक होईल अशी माहिती निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक वैद्य निलेश लोंढे व संचालिका वैद्या सारिका लोंढे यांनी दिली.शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. गणेश रोडे,डॉ. ऐश्वर्या जोशी, नूतन मोहिते आदी उपस्थित होते.
यावेळी वैद्य निलेश लोंढे यांनी सांगितले की, दिनचर्या, ऋतुचर्या, योगाभ्यास, सणांचे आरोग्यदायी महत्त्व, पौष्टिक पाककृती, आहारीय वर्ग त्याचे उपयोग, उपवासाला काय खावे, घरगुती कोणते उपाय करावे, आपली प्रकृती कशी काढावी त्याची आपल्या आजारांशी काही संबंध असतो का ? नक्षत्रवना मधील वनस्पतींचा आपल्या आरोग्याशी कसा संबंध आहे. शरीरात कोणते दोष असतात ते बिघडल्यावर कोणते आजार होतात. पंचकर्म म्हणजे काय त्याने शरीर शुद्धी कशी होते, किती दिवस लागतात अशी सर्व माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आलेली आहे. निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल हे पिंपरी चिंचवड मधील पहिले खाजगी १५ बेडेचे हॉस्पिटल आहे. जिथे ऍडमिटची, मेडिक्लेमची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये २० हुन अधिक विविध विषयातील तज्ञ रुग्णांना मार्गदर्शन करतात. यामध्ये सांध्याचे, मणक्याचे विकार, सोरायसिस, त्वचेचे विकार, दमा, छातीचे विकार, अम्लपित्त, पोटाचे विकार, मूळव्याध, भगंदर, बद्धकोष्टता, महिलांसाठी अनियमित मासिक पाळी, वंध्यत्व उपचार, गर्भसंस्कार तसेच लहान मुलांच्या आजारामध्ये सर्दी, खोकला, दमा, प्रतिकार शक्ती वाढवणे, वजन उंची वाढवणे यांवर विशेष उपचारांची सोय आहे. केसांचे विकार, सौन्दर्य विषयक तक्रारी यासाठी वेगळी ओपीडी हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहे. हृदय रोग, मधुमेह, कॅन्सर, किडनीचे विकार यासारख्या जटिल आजारांसाठी काही संशोधित उपचार निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल मधील तज्ञामार्फत केले जातात.
१८ डिसेंबरला याचे प्रकाशन आमदार महेश लांडगे तसेच महाराष्ट्रातील नामवंत वैद्य ज्योती मुंदर्गी, वैद्य सुकुमार सरदेशमुख, वैद्य अतुल देशमुख, वैद्य संतोष सूर्यवंशी, वैद्य जयकुमार ताम्हाणे, डॉ. सुहास जाधव, डॉ. प्रताप सोमवंशी, डॉ. जबिन पठाण, डॉ. सारिका भोईर, डॉ. हेमा चंद्रशेखर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, गिरीश गांधी आदी उपस्थित राहणार आहेत .

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 2 =

error: Content is protected !!
Exit mobile version