Home ताज्या बातम्या वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकणार्‍या तिन्ही आंबेडकरी...

वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकणार्‍या तिन्ही आंबेडकरी योद्धांना जामीन मंजूर

0

पिंपरी,दि.14 डिसेंबर २०२२ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्याचेहऱ्यावर शाई फेकली होती.यानंतर पोलिसांनी शाई फेकणाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. गेल्या शनिवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडेनं पिंपरीमध्ये शाईफेक केली होती. या प्रकरणी मनोजसह तिघांना पोलिसांनी अटक केली होती. शाईफेक करणाऱ्या तिघांवर 307 कलमासह इतर कलमं लावण्यात आली होती. विरोधकांनी भाजपावर टीका केल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न (307) हे कलम काल मंगळावारी कमी केले होते. राजकीय दाबापोटी हे कलम लावण्यात आल्याचे आरोपीचे वकील सचिन भोसले यांनी सांगितलं होतं.मनोज हा समता सैनिक दलाचा कार्यकर्ता आहे. दरम्यान मनोजच्या सोबत विजय धर्मा ओव्हाळ आणि धनंजय ईचगज या दोन कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आलं होतं. या तिघांनाही आज जामिनावर सोडण्यात आलं आहे.

चिंचवड येथे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्री मोरेश्वर शेडगे यांच्या घरातून बाहेर निघताना समता सैनिक दलाचे सैनिक मनोज गरबडे यांनी शनिवार दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली आणि वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड सचिव विजय ओव्हाळ आणि समता सैनिक दलाचे सैनिक आकाश इजगज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा दिल्या आणि लगेच पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी पोलिसांनी त्या तीन भीम योद्धांना ताब्यात घेतले त्यानंतर सहा तास त्यांना चिंचवड येथील पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले आणि रात्री बारा वाजून 56 मिनिटांनी एफ आय आर क्रमांक 0553/2022 दाखल केला सदर एफ आय आर मध्ये इंडियन पिनल कोड सेक्शन 307,355,353,294,500,501,120B,34 तसेच फौजदारी कायदा (दुरुस्ती सुधारणा )अधिनियम1983 कलम 7 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम1951कलम 37(1),37(3)135 दाखल केले त्याच दिवशी रात्री चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये मी स्वतः ऍडव्होकेट अरविंद तायडे एडवोकेट गौतम कुडूक एडवोकेट आकाश कांबळे एडवोकेट स्मिता कांबळे एडवोकेट गायकवाड मॅडम असे अनेक वकील आणि शेकडो भीम सैनिक रात्री 02:30 वाजेपर्यंत चिंचवड पोलीस स्टेशनला हजर होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सुट्टीच्या दिवशी पिंपरी येथील स्पेशल कोर्टामध्ये सकाळी 11:00 वाजता पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्तामध्ये या तीनही भीमयोध्याना कोर्टासमोर हजर केले यावेळी कोर्टामध्ये शेकडो वकील उपस्थित होते आणि कोर्टाबाहेर हजारो भीमसैनिक उपस्थित होते सदर वकील पत्रावर एकूण 47 वकील बंधूंनी आपले नावे लिहून सह्या केल्या आणि वकीलपत्र स्वीकारले आणि सर्व वकील कोर्टातील बारमध्ये बसून लाईन ऑफ ॲक्शन सह प्लॅन तयार केला सर्व वकील मित्रांनी आपल्याला सुचतील असे मुद्दे सांगितले आणि सर्व वकिलांच्या वतीने असे ठरले की कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यासाठी आपल्या सर्व वकील मित्रांच्या वतीने तीन वकील युक्तिवाद करतील त्यामध्ये ऍडव्होकेट अतुल सोनवणे एडवोकेट अतुल कांबळे आणि एडवोकेट उमेश गवळी त्यानंतर एडवोकेट सचिन भोसले सरांनी सुद्धा युक्तिवाद केला सर्वांच्या युक्तीवादामध्ये हेच सांगण्यात आले की कलम 307 आणि 353 या गुन्ह्यामध्ये लागू होत नाही कारण पोलिसांनी दिलेल्या एफआयआरमध्ये तशा प्रकारचा कंटेंट नाही आणि तशी घटना सुद्धा नाही त्यावेळी मेहरबान कोर्टाने आमचा वकील बंधूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. आणि 14 डिसेंबर 2022 पर्यंत पीसीआर दिला. त्यानंतर आज दिनांक 14 /12 /2022 रोजी नियमित कोर्ट असताना सुद्धा पोलिसांनी या तीन भीम योद्धांना पिंपरी न्यायालयामध्ये सकाळी 11:00 वाजताच उपस्थित केले त्यावेळी सुद्धा हजारो भीमसैनिक कोर्टाबाहेर हजर होते आणि शेकडो वकील कोर्टामध्ये हजर होते त्यावेळी आमची संपूर्ण वकील टीम सकाळी 10:30 वाजल्यापासूनच पिंपरी न्यायालयामध्ये उपस्थित होती तेव्हा या गुन्ह्यातील आयओ यांनी आयपीसी कलम 307 रद्द करण्याचा रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केला आणि कलम 353 व इतर कायम ठेवले आणि कोर्टाने एम सी आर चा आदेश दिला तेव्हा लगेच आम्ही वकिलांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड सेक्शन 437 अंतर्गत जामिनासाठी अर्ज केला आणि कोर्टासमोर बाजू मांडली की सेक्शन 353 हा ट्रायबल बाय सेशन कोर्ट असला तरी त्याची जास्तीत जास्त शिक्षा पाच वर्षांचीच आहे आणि सदर एफ आय आर ही फॅब्रिकेटेड असून सदर गुन्हा खोटा आहे आमची सर्व बाजू मेहरबान कोर्टाने ऐकली त्यावेळी सदर गुन्ह्यातील आय ओ आणि पी पी यांनी या जामीनास जबरदस्त विरोध केला मात्र कोर्टाने आमची बाजू ऐकून काही अटी व शर्तीवर प्रत्येकी 15000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला अशाप्रकारे ही कायदेशीर लढाई सर्व वकील टीमच्या वतीने जिंकण्यात आली आणि न्यायव्यवस्थेचे आभार मानले आणि पहिल्या दिवसापासून एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर सुद्धा कायदेशीर मार्गदर्शन करत होते म्हणून त्यांचे सुद्धा हार्दिक आभार शेवटी हेच म्हणावे लागेल मनोज भावा तू सिद्ध केले की जो समाज सुशिक्षित व जागृत असतो तो अन्यायाविरुद्ध बंड करून उठतो आणि वकील टीमने सिद्ध केले की जो अन्याय विरुद्ध आवाज उठवतो त्याला आम्ही सर्व वकील प्रतिसाद देतो

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − 4 =

error: Content is protected !!
Exit mobile version