Home ताज्या बातम्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची कार्यकणी जाहिर,पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष पदी निलेश तरस तर युवासेना...

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची कार्यकणी जाहिर,पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष पदी निलेश तरस तर युवासेना शहर संघटकपदी राजेंद्र तरस यांची निवड

0

पिंपरी,दि.०८ डिसेंबर २०२२ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- शिवसेनेची दोन गटात विभागणी झाल्याने. उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. दोन गट शिवसनेचे निर्माण झाले आहेत, मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेले आहेत. खासदार बारणे यांच्यासोबत शहरातील अनेक पदाधिकारी आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेला पिंपरी-चिंचवड शहरात मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर देखील बसणार आहे.खा. श्रीरंग बारणे शिवसेनेत येण्याअगोदर शिवसेनेचे फक्त चार नगरसेवक होते. बारणे याच्या प्रवेशानंतर शिवसेनेचे ०४ चे १४ नगरसेवक झाले होते,शिवसेनेत नेहमीच गटबाजी राहिली असल्याचे पुर्ण शहराने पाहिले आहे. त्याचा फटका २०१७ च्या निवडणुकीत बसला होता. खासदार बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असल्याने. खासदार बारणे यांच्यासोबत एकही पदाधिकारी गेला नाही असे काहीजण छाती ठोक पणे म्हणत होते. पण, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी जाहीर झाल्यानंतर अनेक पदाधिकारी, शिवसैनिक हे शिंदे यांच्यासोबत गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे ठाकरे यांची शिवसेना शहरात शिल्लक असणारी बॅकफुटवर गेली आहे अशी चर्चा संपुर्ण शहरात पसरली आहे.याचा मोठा फटका ठाकरे गटाला बसणार आहे.शहराचा किंगमेकर बनण्यास बारणे बनतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

बाळासाहेबांची शिवसेनेच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी बाळासाहेब वाल्हेकर तर पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी निलेश तरस यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड युवासेना प्रमुखपदी विश्वजीत बारणे, महिला संघटिकापदी सरिता साने आणि युवती विस्तारक पदी शर्वरी गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर, मावळ तालुकाप्रमुखपदी राजेश खांडभोर यांची नियुक्ती केली. बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी (दि.७ रोजी बुधवारी) पदाधिकारी जाहीर केले. २०० पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली. बर्‍याच पदाधिका-यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.बाळासाहेबांची शिवसेनेचा पदाधिकारी नियुक्त मेळावा खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑटो क्लस्टर येथे पार पडण्यात आला.यावेळी उपनेते, कामगार नेते इरफान सय्यद उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड आणि मावळचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले.पिंपरी-चिंचवडच्या उपजिल्हाप्रमुखपदी राजेश वाबळे, मावळच्या उपजिल्हाप्रमुखपदी शरद हुलावळे, मावळ जिल्हा संघटकपदी अंकुश देशमुख, पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुख बशीर सुतार, दत्तात्रय भालेराव, पिंपरी विधानसभा प्रमुखपदी रुपेश कदम, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी सुरेश राक्षे, पिंपरी-चिंचवड शहर संघटकपदी सोमनाथ गुजर, रवींद्र ब्रम्हे, हाजी शेख, पिंपरी विधानसभा संघटकपदी सय्यद पटेल, उपविधानसभा संघटकपदी शरद मुळे, अॅड. मुकुंद ओव्हाळ, नामदेव घुले, पिंपरी विधानसभा संघटकपदी नरेश टेकाडे, संदीप पवार, निखील येवले, पिंपरी विधानसभा समन्वयक सुनील पाथरमल, अॅड. दिलीप पाटील, रुपेश चांदेरे, चिंचवड उपविधानसभा संघटकपदी राजेश अडसूळ, अंकुश कोळेकर, प्रशांत कडलक, महेश कलाल, चिंचवड विधानसभा संघटकपदी रोहिदास दांगट, संतोष बारणे, सुदर्शन देसले, चिचवड विधानसभा समन्वयकपदी प्रदीप दळवी, हेमचंद्र जावळे, मयूर तरस, प्रसिद्धी प्रमुखपदी सागर पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली.

मावळ तालुकाप्रमुखपदी राजेश खांडभोर देहु शहर प्रमुखपदी सुनील हगवणे, मावळ तालुका संघटकपदी सुनील उर्फ मुन्ना मोरे, तळेगाव दाभाडे शहरप्रमुखपदी दत्तात्रय भेगडे, वडगावच्या शहरप्रमुखपदी प्रवीण ढोरे, मावळ उपतालुकाप्रमुखपदी धनंजय नवघणे यांची नियुक्ती करण्यात आली मावळच्या उपजिल्हा संघटिकापदी शैला पाचपुते, पिंपरी-चिंचवड शहर संघटिकापदी सरिता साने, उपशहर संघटिकापदी विमल जगताप, दिपाली गुजर, पिपरी विधानसभा संघटिकापदी शैला निकम, चिंचवड विधानसभा संघटिकापदी शारदा वाघमोडे, पिंपरी विधानसभा उपसंघटिकापदी अश्विनी खंडेराव, संगीता कदम, सुनिता भंगाळे, अनुजा शिंदे, चिंचवड विधानसभा उपसंघटिकापदी अंजली चव्हाण, सुनिता चंदने, पुष्पलता गायकवाड, पिंपरी विधानसभा संघटिकापदी रश्मी बल्ला, अपर्णा आगाशे, आरती जगताप, शाहीन पटेल, सुवर्णा गवळी, नेहा साठे, दिपाली सुर्यवंशी, सुनीता बांबळे, पूनम बौराडे, चिंचवड विधानसभा संघटिकापदी मनीषा कारके, नूरजहाँ शेख यांची नियुक्ती करण्यात आली.

युवासेना शहरप्रमुखपदी विश्वजीत बारणे, युवा सेना उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर जगताप, युवासेना शहर संघटकपदी राजेंद्र तरस, चिंचवड विधानसभा संघटकपदी मंदार यळवंडे, पिंपरी विधानसभा संघटकपदी निलेश हाके, युवा सेना चिंचवड उपशहर संघटकपदी सागर बारणे, चिचवड विधानसभा संघटकपदी राहुल पलांडे, पिंपरी विधानसभा युवा सेना समन्वयकपदी केदार चास्कर, चिंचवडच्या युवासेना समन्वयकपदी अभिजीत पाटील, शुभम चौधरी, संघटकपदी अविनाश अडसुळ, रोहित माळी, पिंपरी विधानसभा संघटकपदी अनिकेत पाटील. उपविधानसभा संघटकपदी आशिष बाबर, अविनाश जाधव, सलमान पटेल, निजाम शेख, चिंचवड उपविधानसभा संघटकपदी नितीन पाटील, संग्राम धायरीकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर युवा सेनेच्या मावळ जिल्हा संघटकपदी गिरीश सातकर, उपजिल्हा संघटकपदी दत्ता केदारी, तालुका संघटकपदी विशाल हुलावळे, उप तालुका मावळ युवा अधिकारी योगेश खांडभोर, नाणे उप तालुका मावळ अधिकारी नितीन देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहर युवती विस्तारक पदी शर्वरी गावडे, चिंचवड विधानसभा संघटिकापदी श्वेता कापसे, चिंचवड उपविधानसभा संघटिकापदी वैष्णवी जाधव, समन्वयकपदी रितू कांबळे यांची निवड करण्यात आली. याशिवाय पिंपरी -चिंचवड व्यापारी सेलच्या अध्यक्षपदी किशोर केसवानी, चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत गांगड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या वेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “बाळासाहेबांची शिवसेनेची पदाधिकारी पक्षाचे काम पुर्ण ताकतीनी करतील. पक्षाचे प्रमुख नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन वाढवले जाईल.एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे.. या निर्णयाचा तळागाळातील लोकांना लाभ मिळवून देण्याचे काम पक्षाचे पदाधिकारी करतील. बाळासाहेबांची शिवसेना विचार सर्वांपर्यंत पोहोचवतील. आगामी महापालिका निवडणूक लढणार आहेत त्यासाठी आता पासुनच सर्वजन कामाला लागले आहेत. पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार भाजपसह आमची महापालिकेत सत्ता येईल, असे मत खा.बारणेनी व्यक्त केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × three =

error: Content is protected !!
Exit mobile version