Home ताज्या बातम्या चिंचवड येथे ३९ वर्षीय गिड्या उर्फ विशाल गायकवाड याची भर चौकात हत्या,मारेकरी...

चिंचवड येथे ३९ वर्षीय गिड्या उर्फ विशाल गायकवाड याची भर चौकात हत्या,मारेकरी होते कोण?

0

चिचवड,दि.०३ डिसेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, अगदी अल्पवयीन मुलांपासून गँगवारच्या घटना घडत आहेत अशीच एक घटना काल चिंचवड भागातील मोहननगर येथील विशाल गायकवाड या ३९ वर्षीय सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे.पिंपरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या रामनगर येथील परशुराम चौकात विशालवर गोळीबार करत धारदार शस्त्राने वार करत विशाल गायकवाड उर्फ गिड्या याची हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडालीय. या हत्याकांड प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत असुन. गिड्या उर्फ विशाल एका चौकात उभा असताना मारेकऱ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. आधी गोळीबार करण्यात आला व त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला.जुन्या वादातून हा खुन करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. २३ वर्षीय गुन्हेगार पवन लष्करे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवरच विशालचीही हत्या झाली आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. २५ ऑक्टोबर रोजी मोशी येथील पवन याचीही हत्या करण्यात आली होती.

पूर्वनियोजित हल्ला असल्याची चर्चा पसरली असुन समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास विशाल हा एका चौकात उभा होता. त्यावेळी आठ जणांनी मिळून त्याच्यावर हल्ला चढवला. त्यातील एकाने विशालवर आधी गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याला भोसकण्यात आलं व सपासप वार करण्यात आले.गंभीर जखमी विशालला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. माञ तिथे त्याच्या मृत्यू झाला. विशालवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, अशी माहिती देखील समोर येत आहे. ही हत्या कुणी व का केली, याचा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केला जातोय.

गिड्या उर्फ विशाल गायकवाड हा तरुण सराईत गुन्हेगार होता. अवघ्या २९ वर्षांच्या विशाल गायकवाड वर अनेक गुन्हेही दाखल होते. खून, मारमारी, लूटमार, दरोडा यांसारखे तब्बल १२ गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर होते. २०१७ साली मोक्का अंतर्गत त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती.त्याची दहशत आणि तरुणान मध्ये त्याची क्रेझ होती.व्यावसाय म्हणुन तो पिंपरीमध्ये एक वॉशिंग सेंटर चालवत होता.अशा प्रकारे त्याच्या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली असुन पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकेल अशी चर्चा शहरात पसरली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 2 =

error: Content is protected !!
Exit mobile version