Home ताज्या बातम्या जगदिश गायकवाड यांची रिपब्लिकन पक्षातुन हकालपट्टी – सुरेश बारशिंग

जगदिश गायकवाड यांची रिपब्लिकन पक्षातुन हकालपट्टी – सुरेश बारशिंग

0

मुंबई, दि.३० नोव्हेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड यांची ऑडियो क्लिप समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली असून त्या क्लिपमधून समाजाची भावना दुखविणारे अशोभनीय वक्तव्य समोर आल्याची दखल घेत रायगड जिल्हा अध्यक्ष पदावरून आणि रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य पदावरून जगदिश गायकवाड यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंग यांनी केली आहे.

जिल्हा अध्यक्ष सारख्या महत्वपूर्ण पदावर असताना अशोभनीय वक्तव्य करणे; बेजबाबदारपणे वक्तव्य करणे तसेच आपल्या समाजाच्या नेत्यांच्या विरुद्ध शिवराळ भाषा वापरणे हा अक्षम्य गुन्हा जगदीश गायकवाड यांनी केला असल्यामुळे त्यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि ठाणे पालघर रायगड जिल्ह्यांचे रिपब्लिकन पक्षाचे निरीक्षक सुरेश बारशिंग यांनी घेतला आहे.

जगदिश गायकवाड यांची  रिपब्लिकन पक्षातुन हकालपट्टी - सुरेश बारशिंग

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + nineteen =

error: Content is protected !!
Exit mobile version