Home ताज्या बातम्या “आठवण धर्मांतराची-1956” धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 14 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या कार्यक्रमास हजारोच्या...

“आठवण धर्मांतराची-1956” धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 14 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने या व कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा -विकास कडलक

0

पिंपरी,दि.13 ऑक्टोबर 2022 (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि/किंवा १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्म चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत “धम्मचक्र प्रवर्तन” केले; तेव्हापासून हा दिवस “धम्मचक्र प्रवर्तन दिन” म्हणून साजरा केला जातो.आपल्या पिंपरी चिंचवड शहरातही धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी हा सन 14 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जातो.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव समिती 2022 पिंपरी चिंचवड शहर आयोजित “आठवण धर्मांतराची-1956” बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कलाकार गीतकार गायक राहुल साठे, गायक अजय देहाडे, गायिका भाग्यश्री इंगळे, गायिका विद्या बनसोडे यांच्या सुमधुर आवाजात बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम तसेच माताजी पु.प्रा भिक्खुनी धम्मदर्शना महाथेरी (औरंगाबाद) यांची धम्मदेसना होणार आहे.उद्या शुक्रवार दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजता. स्थळ-रामकृष्ण मोरे पेक्षागृह चिंचवड पुणे 411019 या ठिकाणी भव्य स्वरुपात कार्यक्रम होत आहे.

कार्यक्रमाचे आयोजक नितीन गवळी,विनय बोरकर,अमोल धावारे विजय ओहोळ,पञकार विकास कडलक, पत्रकार प्रकाश बुक्तर, गणेश आलेगावकर,सागर घनवट, राम भंडारे, बाळासाहेब साळवे, आकाश लगाडे, बुद्धभूषण गवळी, सुरेश खरात, विशाल कांबळे धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव समिती 2022 पिंपरी चिंचवड शहर यांनी केले आहे.

या कार्यक्रमास विशेष सहकार्य गवळी मंडप अँड डेकोरेटर्स, प्रजेचा विकास (साप्ताहिक न्युज पेपर ऑनलाईन न्यूज चॅनल),अमोल असोसिएट्स अँड लुंबिनी फिल्म प्रोडक्शन, अनुप साउंड अँड लाइट्स व ए एन एल इ डी, संयोजन समितीच्या वतीने आपणा सर्वांना विनंती व आव्हान करण्यात येत आहे की आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे.गेले दोन वर्ष कोरोनाच्या काळात धम्मचक्र महोत्सव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून साध्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला गेला दोन वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात मोठ्या आपण साजरा करत आहोत या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.आठवण धर्मांतराची 1956 या कार्यक्रमाचे साक्षीदार होऊया आणि धर्मातंराच्या आठवणीनां उजाळा देण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित राहुया.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four + 15 =

error: Content is protected !!
Exit mobile version