Home ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ना धमकी देणाऱ्याला पोलिसांनी लोणावळ्यात केली अटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ना धमकी देणाऱ्याला पोलिसांनी लोणावळ्यात केली अटक

0

लोणावळा,दि.०३ ऑक्टोबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्फोट घडवून आणून जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती रविवारी समोर आली. ही माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. लोणावळ्यात पोलिसांनी या व्यक्तीला बेड्या ठोकल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा कट असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी या व्यक्तीला अटक करून चौकशी केली. त्याने चौकशी धमकीचा फोन करण्यामागील कारणाचा खुलासा केला.

अविनाश आप्पा वाघमारे, असं पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचं वय ३६ वर्ष असून, तो घाटकोपर पूर्व भागातल्या रमाबाई आंबेडकर नगर, वसंतराव नाईक मार्ग, साठे चाळ येथील रहिवासी असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं.अविनाश वाघमारे हा मूळचा आटपाडीचा रहिवासी आहे. अविनाश वाघमारे हा मुंबईला जात असताना लोणावळ्यातील एका धाब्यावर जेवण करण्यासाठी थांबला होता. हॉटेल मालकाने त्याला दहा रुपयाची पाण्याची बॉटल पंधरा रुपयाला दिली. त्यानंतर हॉटेल मालकाला अद्दल घडवण्यासाठी अविनाश वाघमारे याने हा फोन केला होता. अविनाश वाघमारेने स्वतःच्या फोनवरून १०० नंबरवर कॉल केला आणि मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याचा कट असल्याची खोटी माहिती दिली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जिवे मारण्याची धमकी, नेमकं काय घडलं?

रविवारी (२ ऑक्टोबर) दुपारी २.४८ वाजण्याच्या सुमारास लोणावळा (ता. मावळ, जि. पुणे) येथील साईकृपा हॉटेल एनएच ०४ येथे अटक आरोपीने दारूच्या नशेत हॉटेलचे मॅनेजर किशोर पाटील यांनी पाण्याची बाटलीची किंमत जास्त लावल्याचा राग मनात धरून हॉटेल मॅनेजर आणि कर्मचारी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने विनाकारण मोबाईल वरून पोलिसांना खोटी माहिती दिली. यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती. या आरोपीविरुद्ध लोणावळा शहर पोलिसांत विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 + 2 =

error: Content is protected !!
Exit mobile version