Home ताज्या बातम्या शिंदे गटाला झटका;शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच,ठाकरेना मैदान मिळाले मुंबई उच्च न्यायालयचा...

शिंदे गटाला झटका;शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच,ठाकरेना मैदान मिळाले मुंबई उच्च न्यायालयचा निर्णय

0

मंबई,दि.23 सप्टेंबर 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कुणाला मिळणार? यावरून शिंदे गट आणि शिवसेनेत सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय देत हे प्रकरण निकाली काढलं आहे. शिवसेनेला कोर्टाने अखेर परवानगी दिली आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याची आज सुनावणी पार पडली.शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्याची मागणी शिवसेनेनं महापालिकेकडे केली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचं कारण महापालिकेकडून देण्यात आलं. महापालिकेच्या भूमिकेनंतर शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने निकाल दिला. शिंदे गटाला झटका बसला असून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देताना सदा सरवणकर यांची विरोध करणारी याचिका फेटाळून लावली. सदा सरवणकर यांना शिवसेनेकडून याचिका करण्याचा अधिकार नसल्याच्या युक्तिवाद मान्य करत मुंबई उच्च न्यायालयाने सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली.

मुंबई महापालिकेनं शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासंदर्भात करण्यात आलेल्या दोन्ही अर्जांना परवानगी नाकारली. महापालिकेचा निर्णय बरोबर आहे. पोलिसांनी केलेल्या सूचनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेऊन बीएमसीने दोन्ही अर्जांना परवानगी नाकारली, असं न्यायालयाने निकाल देताना म्हटलं.मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलं!दोन्ही अर्जांची कल्पना मुंबई महापालिकेला होती. मुंबई महापालिकेकडे शिवसेनेनं अर्ज दाखल केल्यानंतर पोलिसांचा अहवाल महापालिकेला मिळाला. मात्र, शिवसेनेनं कायदा व सुव्यवस्था राखण्याची हमी दिली. मात्र, महापालिकेनं अधिकारांचा गैरवापर केला, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली.

शिवसेनेकडून वकील एसपी चिनॉय आणि मुंबई महापालिकेकडून वकील मिलिंद साठ्ये यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाच्या वकिलानेही यावेळी जोरदार युक्तिवाद केला. तब्बल चार तास हा युक्तिवाद चालला.दसरा मेळावा हा शिवसेनेचा इतिहास आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कुणाची हा मुद्दा इथे नाही. दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळायला हवी. उद्या कोणीही कोणीही वैयक्तिक येऊन परवानगी मागेल तर ते योग्य नाही, असं शिवसेनेचे वकील एसपी चिनॉय यांनी कोर्टात सांगितलं.मैदानासाठी कुणीही अर्ज करू शकतं ना? असा सवाल यावेळी कोर्टाने केला. त्यावर होय, मैदानासाठी कुणीही अर्ज करू शकतं, असं उत्तर शिवसेनेच्या वकिलाने दिलं. यापूर्वी मनसेनेही शिवाजी पार्कवर परवानगी मागण्याचा प्रयत्न केला होता, याकडेही शिवसेनेच्या वकिलाने कोर्टाचं लक्ष वेधलं.आम्ही शिवाजी पार्कच्या जागेची आधीच मागणी केलीय. शिवाजी पार्क मैदानासाठी सर्वात आधी कुणी अर्ज केला? असा सवाल कोर्टाने केला. त्यावर आम्हीच पहिल्याादा अर्ज केला. 22 आणि 26 ऑगस्ट रोजी आम्ही अर्ज केला होता. 30 ऑगस्ट रोजी शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी अर्ज केला होता, असं शिवसेनेच्या वकिलाने सांगितलं. तसेच शिंदे गटाची याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − 11 =

error: Content is protected !!
Exit mobile version