Home ताज्या बातम्या किवळेतील बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांचे...

किवळेतील बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांचे पीएमपीएमएलला खरमरीत पत्र

0

किवळेआमचे पैसे घेता ना, मग पिंपरी-चिंचवडकरांना चांगली सुविधा द्या- आमदार लक्ष्मण जगताप

किवळे, दि.19 ऑगस्ट 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत किवळे येतील मुकाई चौकात सात वर्षांपूर्वी पीएमपीएमएलसाठी सुसज्ज बीआरटीस बस टर्मिनल उभारण्यात आले आहे. महापालिकेने लाखो खर्च करून उभारलेल्या या बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांनी पीएमपीएमएलला खरमरीत पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. या बस टर्मिनलच्या आसपास दाट लोकसंख्येच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पीएमपीएमएलला दरवर्षी कोट्यवधी देऊनही आणि बस मार्गांवर सोयीसुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही आमच्या शहरातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असेल, तर हे पीएमपीएमएलचे अपयश आहे. आमचे पैसे घेता, तर या शहरातील नागरिकांना चांगली प्रवासी सुविधा द्या आणि किवळे येथील मुकाई चौकातील बीआरटीएस बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यात यावा, अशी मागणी सूचना त्यांनी पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालकांना केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मला त्यांचे लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्यापासून या मतदारसंघाचा विकासातून कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार किवळे येथील मुकाई चौकात सुसज्ज बस टर्मिनल उभारण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर याठिकाणी सप्टेंबर २०१५ मध्ये सुसज्ज बीआरटीएस बस टर्मिनल उभारण्याचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले. औंधला लागून असलेल्या सांगवी फाटापासून ते किवळे या मुख्य बीआरटीएस रस्त्याच्या शेवटच्या टोकाला हे बीआरटीएस बस टर्मिनल उभारण्यात आले आहे. त्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने लाखो रुपये खर्च केले आहेत. पण गेल्या सात वर्षात या बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे दिसत आहे. हे पीएमपीएमएल प्रशासनाचे पूर्णपणे अपयश आहे.

किवळे, मुकाई चौक येथून पुणे मनपा भवन आणि निगडी या दोनच मार्गावर बस उपलब्ध आहेत. मुकाई चौकापासून चौफेर असलेल्या रावेत, किवळे, मामुर्डी, साईनगर, दत्तनगर, उत्तमनगर, भीमाशंकरनगर इत्यादी दाट वस्तीच्या भागातील नागरिकांसाठी पीएमपीएमएल प्रशासन फिडर रुटसुद्धा सुरू करू शकलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांची सार्वजनिक प्रवासासाठी प्रचंड गैरसोय आहेत. खासगी वाहने आणि रिक्षाने प्रवास करून या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमपीएमएलला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे अनुदान देते. तसेच विवध बस मार्गांवर सोयीसुविधा उभे करण्यासाठीही महापालिका दरवर्षी स्वतःचे कोट्यवधी रुपये खर्च करते. एवढा खर्च करूनही पिंपरी-चिंचवडमधील जनतेला चांगली सार्वजनिक सुविधा पुरवली जात नसेल तर ते पीएमपीएमएल प्रशासनाचे अपयशच म्हणावे लागेल.

शहरातील विविध मार्गांवर बससेवा सुरू करणे व बस फेऱ्या वाढवण्याबाबत शहराच्या महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, अन्य पदाधिकारी व सर्वपक्षीय नगरसेवक यांच्याकडून वारंवार सूचना व उपाययोजना करण्याबाबत सूचना करूनही पीएमपीएमएलकडून ठोस कार्यवाही होत नाही, हे दुर्दैवाने सांगावे लागत आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने पिंपरी-चिंचवड शहराबाबतच्या कारभारात आता सुधारणा करावी, अशी माझी सूचना आहे. तसेच किवळे, मुकाई चौक येथील बीआरटीएस बस टर्मिनलचा तातडीने पूर्ण क्षमतेने वापर करण्यास सुरूवात करावी. किवळे ते पुणे विमानतळ, किवळे ते स्वारगेट, देहूरोड ते हिंजवडी फेज-३, किवळे ते आळंदी, किवळे ते चाकण एमआयडीसी, देहूरोड ते पिंपरीगाव या मार्गावर बस पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.”

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × two =

error: Content is protected !!
Exit mobile version