रावेत, दि.15 ऑगस्ट 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रावेत परिसरातील समीर लाॅन्स जवळील सिल्वरलँड रेसिडेन्सी फेज 3 मध्ये स्वातंञ्य दिना निमित्त आझादी अमृत महोवत्सवा चे आयोजन करण्यात आले होते.विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव साजरा करण्यात आला. युवा नेते माननीय दिपक मधुकर भोंडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करयात आले,
या जमलेल्या सोसायटी च्या सदस्यांना संबोधीत केले. सोसायटी मध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये चेस, कॅरम बोर्ड, लिंबू चमचा, डान्स, गायन, इत्यादी कार्यक्रम झाले.सगळ्या विजयी झालेल्या व उपविजयी ठरलेल्या संपर्धाकांचं चषक मानचिन्ह देऊन अभिनंदन केलं. यामध्ये श्री गजानन लोखंडे कॅरम बोर्ड मध्ये तर स्वरूप चेस मध्ये विजयी ठरले. लहान मुलांच्या स्पर्धेत श्वेता राठोड ही कॅरम बोर्ड मध्ये आणि अमेय जरांडे चेस मध्ये विजयी ठरले तर उपविजेता योगेश जरांडे कॅरम बोर्ड आणि प्रवीण बारगीर (चेस) ठरले. लहान मुलांमध्ये ओम राठोड कॅरम बोर्ड आणि शाश्वत देशमुख चेस बोर्ड मध्ये उपविजेता ठरले. या वेळी सोसायटी चे चेअरमन वैभव देशमुख व सेक्रेटरी नचिकेत देशमुख यांनी दिपक भोंडवे यांचे आभार व्यक्त करत स्वागत केलं.
या कार्यक्रमांचे आयोजन सिल्वरलँड सोसायटी च्या सांस्कृतिक समितीने केले.इनिका अम्रित, प्रियल देसाई, प्रदीप सत्नाक, राजेश्री देशमुख, निकिता कंडोलकर, सौरभ मसादे, विक्रम कुमार , विक्रम निकम, अनिकेत नाखरेकर, विनोद राठोड, सुशील कदम, वैभव देशमुख,श्रीनाथ देसाई, प्रवीण बारगीर, सुरज लोखंडे, राजू मोरे, पवन निनावे, विकास जाधव, आदित्य पानसे, श्री हर्षद घडी यांनी सहभाग घेतला व कार्यक्रम पार पाडला,सर्व सोसायटीचे नागरीक उपस्थित होते.सुञसंचलन वैभव देशमुख यांनी केले तर आभार नचिकेत देशमुख यांनी मानले.